पोस्ट्स

ऑक्टोबर, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आली एकदाची..

इमेज
काल बँगलोर च्या मेट्रो ने प्रवास केला. प्रवास केला म्हणजे, एका स्टेशन वरून चढलो, दोन स्टेशन सोडून उतरलो, आणि परत विरुद्ध बाजूने चढून प्रारंभीच्या स्टेशन वर आलो. थोडक्यात गाडी गाडी खेळलो. गेली पाच वर्षे जिची बंगळूरकर आतुरतेने वाट पाहत होते तिचा पहिला टप्पा सुरु झाला या आठवड्यात; आणि लोकांनी आपली लाडकी मेट्रो बघायला रजनीकांतच्या सिनेमाला होते तशी गर्दी केली. रविवार ची सुट्टी साधून काही मंडळी सहकुटुंब या चमत्काराला पाहायला आली होती. जशी स्टेशन वर एन्ट्री घ्यायची तशी आरोळ्या आणि शिट्ट्या मारून आनंद व्यक्त करत होते. माझाही हा पहिलाच मेट्रो प्रवास होता. मी दिल्ली मेट्रो नाही अनुभवली त्यामुळे मलाहि तिचे अप्रूप होतेच. या शहराने अक्षरश: हाल सहन केले आहेत हा दिवस पाहण्यासाठी. पूर्ण बँगलोर खोदलेले, अशक्य ट्रॅफिक, प्रत्येक रस्त्यावर मेट्रोचे खांब टाकायचे काम चालू, रस्ता धुळीने माखलेला अशी अवस्था प्रत्येक मुख्य मार्गांची. अजूनही कामे चालूच आहेत. मी स्वतः अनुभवलेली गोष्ट म्हणजे ८-१० किमी जायचे असेल तरी नको नको व्हायचे. बरं इथली ट्रॅफिकच वेगळी.. हे रुंद रोड पण एकदा अडकले तर ५-५, १०-१० मिनिटे ...

जलते है जिसके लिये

इमेज
आज सकाळी परोठे, दही आणि लोणी घेवून यज्ञकर्म चालू होते. सजित पेपर वाचता वाचता म्हणाला की की हा ब्रेस्ट कॅन्सर वरचा लेख पहिला का? तसा पेपर वाचनाची माझी आणि त्याची वेळ वेगवेगळी. दोघेही अगदी नित्यकर्म मानून पेपर वाचत नाही. पण रोज सकाळी तो टाईम्स ऑफ इंडिया चा पाटीभर जाहिरात कम बातमीपत्र वाला गठ्ठा दारासमोरून उचलून आणतो जरूर. त्या गठ्ठ्याचा उपयोग किचन मध्ये, जेवताना खाली अंथरायला आणि क्वचित कधीतरी वाचायला म्हणून होतो. मी बऱ्याचदा बँगलोर टाईम्सच वाचतो, न जाणो कुठून मी हि सवय लावून घेतली. टॉयलेट मध्ये उगीच जड विषय नको पेलायला म्हणून कदाचित मला या वाचनाची आवड लागली. पहिले पान कुठलीतरी नवीन इनमीन ३ सिनेमे केलेली बया सांगत असते की "माझं सर्व लक्ष फ़क़्त करीयर आहे आणि अमका तमका माझा फ़क़्त चांगला मित्र आहे". कुणी बॉलीवूड चा नट-नटी आयुष्यात पहिल्यांदाच बँगलोर ला आले असले तरी "ह्या शहराशी माझे कित्ती-कित्ती गहिरे नाते आहे" वगैरे भंपक टाकत असतो. कन्नड सिनेमांच्या नटांना उगीच कुठेतरी कोपर्यात परमनन्ट आरक्षण असते, न जाणो उद्या कनसे निघाली तर? पान दोन पूर्ण जाहिरात, पान तीन कुठल्...

द बिग बँग थियरी: शास्त्रज्ञांतल्या माणसांचे जग-२

इमेज
आमचे परममित्र हेमचंद्ररावजी साहेब, हे दोन वर्षांपूर्वी अमेरिकेला गेले खरे, पण जेव्हा परत आले तेव्हा कंपनीने त्यांना (एकटेच) हनिमूनला पाठवले होते की काय, असा प्रश्न पडला. दोन महिन्यात पश्चिम अमेरीकेतली बरीचशी लोकप्रिय पर्यटन स्थळे फिरले आणि तिथे त्यांचे ढीगभर ट्रेडमार्क पोझ मधले फोटो काढून आणले. येताना मित्रांसाठी चॉकलेटं आणि तिथल्या द्रुतगती इंटरनेटचा वापर करून संग्रहित केलेले पिक्चर आणि मालिकांचे ऋतूचे ऋतू घेवून आले. हेमंत.. जाहीर आभार. या संग्रहामध्ये हा फोल्डर होता The Big Bang Theory नावाचा. म्हटले असेल नॅट जिओ, नाहीतर डिस्कवरी ची डॉक्युमेंटरी. एक दिवस असाच माझ्यातला स्युडो-सायंटीस्ट जागा झाला आणि म्हटले बघूया तरी, कळले तर कळले नाहीतर उद्या उठून कोड-फोड आहेच. आणि अशी सापडली माझी सर्वात आवडती सिटकॉम. ---- शेल्डन कूपर हे मालिकेचे मध्यवर्ती पात्र. हा शेल्डन आहे दैवी प्रतिभा लाभलेला सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ. त्याच्या जगात आहे त्याचा रूम-पार्टनर लेनर्ड हॉफस्टेडर आणि त्याचे आणि नाईलाजाने शेल्डन चे झालेले मित्र हॉवर्ड वोलोवित्झ आणि राज कुथ्रपल्ली. लेनर्ड हा प्रायोगिक भौतिक शास्त्रज...

द बिग बँग थियरी: शास्त्रज्ञांतल्या माणसांचे जग-१

इमेज
प्रश्न: नाव बिग बँग चे आणि फ्रेंड्स चे पोस्टर काय करतेय? उत्तर : आधी थोडा माहोल.. कॉलेजमध्ये असताना बऱ्याचदा मित्रांकडून 'फ्रेंड्स' बद्दल ऐकायचो. नुसताच ऐकायचो, कारण सिटकॉम हा काय प्रकार असतो हे आमच्या गावात पण नव्हते. स्टार प्लस वरचे 'स्मॉल वंडर्स' आवडीने बघायचो, पण फ्रेंड्स आणि स्मॉल वंडर्स याची जातकुळी लैच वेगळी हे फ्रेंड्स बघितल्यावर कळले. आता काही इनोदी हिंदी मालिका असायच्या पण त्यांना कॉमेडी म्हणणे जीवावर येते. त्यातल्या त्यात 'साराभाई वर्सेस साराभाई', 'श्रीमान श्रीमती' हे सन्माननीय अपवाद वगळता, पाट्या टाकण्याची परंपरा सर्व मालिकांमधून अजूनही दिसते. जाउदे, लिहिता लिहिता असे वाटतेय कि या भारतीय आणि त्या अमेरिकन मालिकांची तुलना करणेच चुकीचे आहे. तर, फ्रेंड्स वर कॉलेज मध्ये चर्चा कधी माझ्याकडून झालीच नाही. आता नक्की आठवत नाही, पण तीन चार वर्षांपूर्वी मला फ्रेंड्स चे सगळे ऋतू ( आता आणखी काय म्हणू सिझन ला? :) ) मिळाले. आणि मग समजले कि पब्लिक याच्यामागे एवढी फिदा का.. मेहनत घेवून बनवलेली पात्रे, त्यांच्यात अक्षरश: जीव ओतणारे नट, विचारपूर्वक मांडणी केले...

दे दणका 'फोर्स' !

इमेज
इंटरवललाच मनाचा हिय्या करून बाहेर निघालो. (आईंग??)   मल्टीप्लेक्स मध्ये तिकीट, लाह्या, आणि सटरफटर पेय याच्यावर खर्च केल्यावर मधेच बाहेर पडणे लय जीवावर येते. तसा कशामधूनही बाहेर पडायचे मला पहिल्यापासूनच वावडे आहे. अगदी चाळीस मार्कांचा पेपर लिहायचा असला तरी मी बाकी दीड-दोन तास कोऱ्या उत्तरपत्रिकेकडे बघत काढलेले दिवसपण आठवतात. त्यामुळे सजीत (माझा सदनिकामित्र) ने जेव्हा हा सोडून देण्याचा विचार माझ्या डोक्यात पेरला तेव्हा लय बोर झाले. आता मी इंटरवल पासून न बघण्यामागचे कारण सांगतो.. हा पिक्चर इतका वाईट मुळीच वाटला नव्हता. पण, सजीत ने तमिळमध्ये याचा मूळ सिनेमा 'काखा काखा' पहिला होता. या इसमाला म्यानर्स नाहीत, मला आधीच सांगितले की जेनेलिया मरते म्हणे. हिरॉईन मरते? गझनी त्यासाठीच पाहिला नाही मी थेटरात. विश्वास नाही बसणार पण गझनी मी तीन वेळा पहिला नंतर.. पाहिला म्हंजे मला बळच दाखवण्यात आला. पळायची सोय नाही, दारे बंद. कान-डोळे बंद करायची सोय नाही, अवघडलेल्या स्थितीत आणि चार माणसांसमोर तसे करणे बरे नाही वाटत. हो, दोनदा पुणे-मुंबई-पुणे, आणि एकदा उटी-मैसूर प्रवासात बसमध्ये दाखवला त्या क्रू...