पोस्ट्स

मे, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुतीनच्या वाट्याची सफरचंदे

इमेज
दुपारी होस्टेल वर आल्याआल्या समोर सफरचंदाची पेटी दिसली. कदाचित कुणीतरी ठेवली असतील घेवून जायला. पण एवढी पेटीभर सफरचंदे कोण ठेवेल उगाच असे वाटून मी घेतली नाहीत. वर आल्यावर रेक्टर काकूंनी विचारले.. ल्युबिश याब्लक? उम्म.. ताक.  दोन सेकंद तर्क लावला..चल्ला फुकटची सफरचंदे. रूम वर आल्यावर पिओतेक ला विचारले. काकूंचा वाढदिवस वगैरे आहेका फुकटची सफरचंदे वाटायला? त्याने मोठ्या प्रयासाने शब्दाला शब्द जोडून सांगितले - रशिया ने युक्रेन वर २०१४ मध्ये हल्ला करून क्रीमिया विलीन करून घेतले. त्याचा निषेध म्हणून पाश्चात्य जगाने, म्हणजे अमेरिका व नेटो देशांनी रशियावर व्यापारी बंधने लादली. आता असल्या बंधनांना मानेल तो पुतीन कसला. रशियाने पण आपली चाल म्हणून युरोप कडून आयात होणार्या बहुसंख्य अन्न पदार्थावर बंदी घातली. त्यात पोलंड च्या सफरचंदांची लागली. रशिया पोलंडच्या ५० टक्क्याहून जास्त सफरचंदांची आयात करतो. पोलंड ला या व्यापारातून ५०० मिलियन युरो मिळतात. आता जर रशिया घेत नाही, तर एवढ्या सफरचंदांचं करायचे काय? म्हणून पोलंड च्या उत्पादकांनी ही जास्तीची सफरचंदे सरळ सरळ फुकट वाटायला चालू केलीयेत. गावागावा...

Renaissance of Marathi Cinema

इमेज
It's been almost two weeks since I watched Sairat. It captured my mind and it's not going anywhere soon. More than the ending, I am now intrigued about the whole Sairat phenomena. First, its music. Raj has written about the songs of this movie on  his blog . Then, Sairat's director - Nagraj Manjule. His life is no less than a movie itself. He should be a paradigm shift for many of us. I watched his interview "Great Bhet" by senior journalist Nikhil Wagle. How many times have we heard that people can change inside out over the period? Honestly I never totally believed that persons can evolve so drastically.  Even the story of Walmiki didn't feel right to me. Nagraj is a living example of such a shift of personality. He failed the 10th standard exam twice, was a narcotic addict, had violent past; today, he speaks eloquently about most sensitive issues of mankind. He doesn't just speak but expresses it through his art. He is not just a loner artist deepl...

सॉरी नागराज, मी सैराट ऑनलाईन पाहिला

इमेज
(potential spoilers) इतकी हाईप केल्यावर दम तरी कसा काढणार? त्यात रोज whatsapp वर काहीना काही नवीन.. "इतका मोठा ससा नववीतच कसा" वगैरे.. आणि सैराटची पूर्ण गाणी युट्युब वर आधीच रिलीज करून झिंग लावण्याची पूर्ण व्यवस्थाच केलेली होती. मग काय बघितला. इथे पोलंड मध्ये रिलीज होण्याची शक्यता कमीच होती तशीही. पण पुण्यात तिकीट काढलं मी. एका रिकाम्या खुर्चीने माझ्याऐवजी बघितला तो पिच्चर थेटरात. उसूलोका वैसे पक्का हू मय.. मागे बाजीराव मस्तानी च्या वेळी पण असेच कंट्रोल नाही झाले, पण जसा तो ग्राझ मध्ये रिलीज झाला.. मी परत थेटरात जाउन बघितला. ग्राझ मध्ये आला नसता आणि ऑनलाईन पण नसता तर म्युनिच ला जाण्याची पण तयारी केली होती. पण तशी वेळ आली नाही. बास.. आत्ता सैराट.. फक्त सैराट. ख त र ना क.. आयच्या गावात.. भन्नाट पिच्चर बनवलाय. नेहमी प्रमाणे म्हंटले असते हॉलीवूड च्या तोडीचा आहे.. पण, कदाचित आता एखादा हॉलीवूड चा पिच्चर सैराट च्या तोडीचा आहे असा उल्लेख करेन मी कधीतरी. एव्हाना सगळ्यांनी पाहिलाच असेल.. मला एवढा का आवडला? काही नवीन स्टोरी आहे? नाही.. मग? सैराट ला मातीचा गंध आहे. सल्...

बदलुराम का बदन जमीन के नीचे है

इमेज
Tue. may 2016 मागे एकदा ब्रिज ऑन रीवर  क्वा य  वर लिहिले होते. त्यात कर्नल बुगी मार्च हे गाणे सैनिक मार्च पास करताना वापरायचे याचा उल्लेख केला होता. असेच एक आणखी रेजिमेंटल सॉंग फेसबुक वर अमित ने शेयर केले काल परवा. "बदलुराम का बदन" हे ते गाणे. गाण्याच्या ओळी अशा आहेत - "बदलूराम का बदन जमीन के नीचे है, बदलूराम का बदन जमीन के नीचे है, तो हमे उसका राशन मिलता है" असाम रेजिमेंट चे गाणे आहे हे. या गाण्यामागची कथा थोडी करूण पण गमतीशीर आहे. दुसर्या महायुद्धात असाम रेजिमेंट बदलूराम नावाचा सैनिक धारातीर्थी पडला होता. पण त्याच्या हुशार क्वार्टर मास्टर ने त्याच्या वाट्याचे रेशन चालूच ठेवले. पुढे जेव्हा कोहीमाला जपान्यांच्या वेढा पडला, त्या वेळी हे जास्तीचे रेशनमुळे ब्रिटीश-भारतीय सैनिकांना आणखी काही दिवस तग धरता आला अशी ती कथा. खरेतर एका सैनिकाचे रेशन घेवून असा कितीसा फरक पडणार असे वाटू शकते. कदाचित बदलूराम पासून चालू झालेली हि प्रथा त्यांच्या क्वार्टर मास्टर ने आणखी बर्याच मृत सैनिकांसाठी वापरली असावी आणि त्यामुळे त्यांना वेढ्याच्या ...