खनिज तेलाचे ऋण
हो. अमेरिकन तेल वायदे बाजारात तेलाची किंमत एका पिंपामागे उणे ३७.६३ डॉलर झाली. पण याचा अर्थ लगेच असा होत नाही कि सामान्य अमेरिकन लोकांना पेट्रोल फुकट मिळेल. ही बातमी वाचताना चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला. नंतर याबद्दल आणखी जाणून घेताना माझा मित्र मुस्तफा, जो कमोडिटी मार्केट मध्ये ट्रेडिंग करायचा त्याचे बोल आठवले.. "जर करार संपण्याच्या आधी लॉट विकले नाहीत तर घरी आणून देतील बरका."* हे उणे तेलाच्या किमतीचे काय प्रकरण आहे हे समजून घेण्यासाठी वायदे बाजार काय असतो हे पाहावे लागेल. ---- समजा सागर एक पोल्ट्रीवाला आहे. त्याच्याकडे २०२० मार्च महिन्याच्या सुरवातीला १००० पिल्ले आहेत. मे महिन्याच्या शेवटी कोंबड्यांची पूर्ण वाढ होऊन तो कोंबड्या बाजारात विकणार आहे. साधारण १०० रुपये कोंबडीमागे सुटतील अशी त्याला अपेक्षा आहे. कोंबड्या संगोपनाचा खर्च ५० रुपये प्रति कोंबडी येणार आहे. पण सागरला थोडी धाकधूक वाटते आहे कि ५० हजारांची गुंतवणूक करून जर अपेक्षित किंमत आली नाही तर? अशा वेळी तो एक आयडिया करतो. वैभव या कोंबडीच्या व्यापाऱ्याला तो भेटतो. ५०० कोंबड्या मे महिन्यात विकायच्या आहेत असे तो...