पोस्ट्स

experience लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वाद पाहावा करून

इमेज
मागच्या वर्षी हेलसिंकीत राहात असताना, कॅम्पसवर फिरताना अक्षरशः सतराशे साठ प्रकारचे क्लब्स, ग्रुप्स आणि सोसायट्यांची पोस्टर्स दिसायची - ट्रेकिंग क्लब्स, योगा ग्रुप्स, बायबल स्टडी सर्कल्स, तत्त्वज्ञान चर्चा मंडळं, अगदी कोणती कल्पना करा ती सापडेल! अश्यात एक दिवस एका साध्याशा पोस्टरवर नजर पडली - "Join Helsinki Debating Society." वाद घालणे हा माझा आवडता विषय, त्यामुळे लगेच वाटलं - "चला, जरा टाईमपास होईल, नवीन लोक भेटतील, आणि आपली बोलायची हौस पण पूर्ण होईल!" मार्च महिना होता. हेलसिंकी बर्फात गाडलेलं, त्यात त्या दिवशी पाऊसही पडत होता - त्यामुळे हवेत एक भन्नाट गारवा पसरलेला. अशा थंडगार संध्याकाळी मी एका बिल्डिंगच्या तळघरात पोचलो. बरीच मंडळी आधीच जमली होती. मनात कल्पना होती की, एखादा विषय देतील, दोन गट पडतील, आणि वाद घडवतील. पण प्रत्यक्षात तिथल्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी सुरुवातीलाच आम्हाला एका ठराविक पद्धतीने वाद घडवायचे नियम समजावले - British Parliamentary Debate Style. थोडक्यात, ही पद्धत अशी असते: दोन टीम्स नाहीत - चार टीम्स असतात: दोन "Government" बाजूच्या (जो...

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

इमेज
मी गेले काही महिने फिनलंड च्या हेलसिंकी या राजधानी शहरात आहे. गेल्या ७ वर्षांपासून फिनलंडला सर्वात आनंदी राष्ट्र म्हणून घोषित करतायेत त्यामुळे इथे येण्यापूर्वीच उत्सुकता होती. भारताचा नंबर एवढा मागे का हे मलादेखील कोडेच आहे. मागे मागे तर मागे, रशिया, पॅलेस्टाईन, युक्रेन या युद्धाने गांजलेल्या देशांपेक्षा किमान या वर्षी तरी भारताचा वरचा नंबर असावा अशी अपेक्षा होती. त्यामुळे या Happiness Index भानगडीवर किती भरोसा ठेवायचा हे समजून जाते. पहिले तर आनंद म्हणजे काय याची व्याख्या बघायला हवी. कारण जे हा आनंद निर्देशांक बनवतात, ते स्वतःच्या व्याख्येनुसार सर्वेक्षण करत असतील, तर बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे होऊ शकतात. मागे इंग्रजी कोरावरच एका आफ्रिकन नागरिकाचे उत्तर वाचण्यात आले होते. जगातल्या गरीब राष्ट्रांमध्ये त्याच्या देशाचा वरचा नंबर होता. पण त्याचे म्हणणे असे होते कि त्याने त्याच्या आजोबांना एवढ्या गरीब राष्ट्रामध्ये राहून देखील कधी दुःखी पाहिले नाही. त्यांनी कधी कर्ज घेतले नाही, कधी फार आजारी पडले नाहीत, स्वतःच्या शेतात पिकेल ते खाऊन अगदी ठणठणीत आयुष्य जगले. त्यांच्यासारखे असे बरेच जण त्याच्या...

ऑनलाईन शॉपिंग

इमेज
माझ्या दैनंदिन वापरातील या वस्तू मला अतिशय उपयुक्त वाटल्या. १. मच्छरांना हाकलण्यासाठी केमिकल वेपरायझजर इतकी वर्ष वापरत आलो. मला नेहमी वाटायचे की ही रसायने जी मच्छरांना नको असतात ती आपल्या शरीराला काही प्रमाणात का होईना हानिकारक असतील. पण त्याला पर्याय देखील नव्हता. मच्छरदाणी एकतर फार किचकट प्रकार. वर लावली की फॅन ची हवा देखील लागत नाही. मच्छरांना मारण्यासाठी रॅकेट देखील आहेच, पण ते घेऊन मच्छरांच्या मागे टेनिस खेळावे लागते. त्यामुळे नाईलाजाने का होईना, गुडनाईट, ऑल आऊट सारखे वेपरायझर्स महिन्यातून दोन वेळा आणून लावणे हाच पर्याय होता. घरात बाळ आल्यापासून गुडनाईट वेपरायझर वापरणे आणखी धोकादायक वाटू लागले होते. असे काही असेल का जेणेकरून या व्हेपरायझर पासून सुटका होईल, हे शोधताना मला खालील लॅम्प सापडला. याचे कार्य इलेक्ट्रिक रॅकेट सारखेच आहे पण निळ्या प्रकाशाकडे मच्छर स्वतःहून आकर्षित होऊन मरतात. मला तर घेण्यापूर्वी विश्वासच नव्हता. पण एक दोन दिवसातच याची उपयुक्तता कळली. आज दोन महिने झाले आम्ही घरात गुडनाईट किंवा ऑलआऊट आणले नाही. हा लॅम्प एका ठिकाणी लावून झोपले कि मच्छरांचा काहीही त्रास होत...

The Wroclaw Experience

इमेज
What is the review on the Wroclaw University of Technology Poland for Indian students? I went to Wroclaw to get the European Experience. I had the experience of working as a software professional for 8 years before I moved to Wroclaw.  I have a bachelor's degree in Mechanical Engineering and took a course in Automotive Engineering at the Wroclaw University Of Technology in 2015. I will be blatantly honest here. If you are an Indian student with no prior work experience and choose to go to Poland just because you didn't get admission to a German University, please don't go to Poland. If the German Universities have assessed you to be unfit for a program, there are mighty chances that you are unfit for a program in any Polish university. There could be exceptions, but please, do not kid yourself. Education in Wroclaw is not easy. Just because you got admission easily doesn't make the rest of the education easy. I had to study hard to pass many of the subjects. It was not ...

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक

इमेज
मूळलेख ( माझा मूळ इंग्रजी लेख ब्लॉग वर प्रकाशित केल्याचा दिनांक - जानेवारी २०१८) मी माझ्या आजीला (वय 85 वर्षे, पुणे) डॉ. पांडुरंग कुंभार यांच्या दवाखान्यात तिच्या अर्धांगवायूच्या उपचारासाठी घेऊन गेलो होतो. माझ्या आजीला 20 नोव्हेंबर 2016 रोजी अर्धांगवायूचा झटका आला. पहाटेच्या सुमारास तिला उजव्या हातामध्ये सुन्नपणा जाणवला आणि ती आमची उठण्याची वाट पाहत होती. तिने आम्हाला सांगितले की तिला तिचा उजवा हात अजिबात हलवता येत नाही. ती व्यवस्थित बोलू शकत होती. आम्हाला वाटले की थंडीमुळे ते तात्पुरते सुन्न झाले असेल. 4 तासांनंतरही ती हलू शकली नाही तेव्हा आम्ही तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. डॉक्टरांनी उपचार सुरू केले आणि आम्हाला सांगितले की हा अर्धांगवायूचा झटका होता आणि तिच्या उजव्या हाताचा 90% आणि उजव्या पायाचा 60-70% भाग अर्धांगवायूमुळे निश्चल झाला होता. डॉक्टरांनी नमूद केले की अशा परिस्थितीत लवकरात लवकर उपचार चालू केले तर बरे होण्याची शक्यता जास्त असते. तिला पुढील 1 आठवडा दवाखान्यात औषधे, इंजेक्शन्स आणि फिजिओथेरपी दिली गेली. तिची प्रकृती स्थिर होती पण आम्हाला काहीच सुधारणा दिसत नाही. सर्व प्रिस...

आपल्या आयुष्यात कोणत्या 10 गोष्टी आपण थांबवल्या आहेत

इमेज
आपल्या आयुष्यात कोणत्या 10 गोष्टी आपण थांबवल्या आहेत? प्रश्न चांगला आहे. खरेतर १० पेक्षा जास्तच गोष्टी थांबवल्या असतील पण प्रश्नचा मान राखून १० गोष्टी आठवून लिहितो. १. तुलना करणं प्रत्येकाचा मार्ग वेगळा. आज कुणाकडे काय आहे कुणाकडे काय नाही, अमक्याचा पगार एवढा माझा केवढा या तुलना आता नको वाटतात. सगळे जण आपापल्या परीने आपापले जीवन सुंदर करत आहेत हेच खूप नाही का? अब्जाधीश गुंतवणूकदार आणि तत्वज्ञ नवल रविकांत म्हणतात की तुलना करून एखाद्याबद्दल असूया आपण त्याच्या आयुष्याचा एकांगी विचार करून करतो. एखाद्याचे आयुष्य तुमच्यापेक्षा चांगले आहे आणि तुम्हाला तसे पाहिजे असेल तर त्याच्यासारखे सरसकट आयुष्य मिळालेले चालेल का? उदाहरणादाखल आज जर कुणाला रतन टाटांची संपत्ती मिळाली तर त्यांचे वार्धक्य पण घेण्याची तयारी पाहिजे. "जावे त्यांच्या वंशा" लहानपणापासून ऐकतोय, आता अनुभूती घेतोय. असूया माणसाचा स्वभावदोषच आहे, तरीपण तुलना करायची असेल तर आज आपण जसे आहोत ते कालच्यापेक्षा चांगले आहोत का नाही याची करतो. म्हणजे स्वतःशीच. २. न्यूज बघणं आता मी भारतीय न्यूज चॅनेल बघणे सोडून दिले आहे. ९०% चॅनेल्स बातम...

विमानाच्या प्रवासात तुम्हाला भेटलेली एखादी चांगली व्यक्ती कोणती? का?

इमेज
विमानाच्या प्रवासात तुम्हाला भेटलेली एखादी चांगली व्यक्ती कोणती? का? सिटीझन केन नावाचा हॉलिवूड चा एक जुना माझ्या आवडीचा चित्रपट आहे. चित्रपट सुरु होतो तेच त्यातला अब्जाधीश वृद्ध नायकाच्या तोंडी शेवटचे शब्द असतात - 'रोझबड'. मृत्यूसमयी तो हे का म्हणाला आणि त्याचा अर्थ काय याविषयी माध्यमांत अंदाज आणि तर्क चालू होतात. नंतरचा संपूर्ण चित्रपट या नायकाची म्हणजे 'चार्ल्स केन' याची जीवनकहाणी आहे. रोझबड म्हणजे काय यासाठी जंग जंग पछाडणारे वार्ताहर नायकाच्या एका जवळच्या मित्राला त्याबद्दल विचारतात त्यावर त्यालाही काही माहित नसते. पण तो त्याचे अनुमान सांगतो की ती एखादी व्यक्ती असेल जी केन महाशयांच्या लक्षात राहिली. यावर त्या वार्ताहराचे समाधान न झाल्याने तो म्हातारा मित्र पुढील गोष्ट सांगतो. मिनिटभराचा हा संवाद हॉलिवूड च्या उत्कृष्ट संवादांपैकी एक आहे. A fellow will remember a lot of things you wouldn't think he'd remember. You take me. One day, back in 1896, I was crossing over to Jersey on the ferry, and as we pulled out, there was another ferry pulling in, and on it, the...

Corona days and Plasma

इमेज
It's 16th April 2021. We are probably in the peak days of the Covid-19 second wave. Last week my uncle was diagnosed with Covid-19 and he was shifted to a Covid hospital near my cousin's home. The hospital was small and in the next few days, we had to take him to a slightly bigger hospital for a ventilator bed because his condition worsened. The trouble we had to go through getting a ventilator bed and Remdesivir injection could not be explained in a single post. I had never experienced such a situation in my life nor did I imagine that this could happen in my city - Pune. The purpose of this post is about making people aware of getting Plasma. The doctors told us that my uncle would need Plasma for further treatment. His blood group is O+.  For Covid patients, it is not enough to have any Plasma. It has to come from a patient with Covid-19 antibodies. Meaning the donor himself must have been cured of Covid-19 at least before 28 days but not before 4 months. You can imagine the...