पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दो लफ्जों की है ये कहानी

इमेज
लहानपणी हे गाणे कधीतरी रंगोली मध्ये पहिल्यांदा पाहिले. विचित्र आकाराच्या होडीचा नावाडी उभ्याउभ्या गाणे म्हणतोय, झीनत त्याचा अर्थ सांगतीये आणि अमिताभ तिला "गाके सुनाओ" असं म्हणतो आणि ती जास्त आळोखेपिळोखे न घेता डायरेक्ट गायला चालू करते हे मला कैच्या कै वाटल्यामुळे मी कधी या सुमधुर गाण्याचा परिपूर्ण आस्वाद घेतलाच नाही. पण आता दिवसातून ४ वेळा हे गाणे तरी पाहतोय, ऐकतोय. याचे कारण म्हणजे व्हेनिस याची देही याची डोळा पाहिले आणि ने राहवून या शहराचे पहिले स्वप्न दाखवणार्या या गाण्याची आठवण आली. पोलंडमधून इकडे ऑस्ट्रियामध्ये काप्फेनबेर्ग ला आल्यापासून इटली चे वेध लागले होते. इतिहासाच्या पानापानातून पाहिलेल्या रोमन साम्राज्याची, रेनेसांस च्या धुरंधरांची कर्मभूमी, जगप्रवासाचा पुस्तकातून मानाने डोलणारा पिसाचा मनोरा आणि कितीतरी सिनेमांमधून चित्रित झालेले व्हेनिस. इटली म्हणजे वर्तमानात जगणारा इतिहास आहे. याची प्रचीती घ्यायची सुवर्णसंधी आली या महिन्यात. मागल्या कंपनीत सोबत असलेल्या वज्रदेहीचा (आव्वाज आहेका याच्या नावासमोर कुणाचा) मेसेज नोव्हेंबर च्या सुरवातीला व्हॉट्सअॅप वर धडकला. वज्...