अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का
भारतासारख्या विकसनशील देशाने अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का? आणि का? आपल्या देशाच्या आकारमानाने हा खर्च अवाढव्य नक्कीच नाही. अवाढव्य खर्च हे विशेषण संरक्षण खर्चाच्या बाबतीत योग्य शोभेल. भारताला स्वतःचा अवकाश कार्यक्रम का हिताचा आहे, हे आता सर्वश्रुत आहेच. मी तुम्हाला एक आणखी बाजू सांगतो. कोणत्याही देशाला त्याची ओळख बनवावी लागते. बनवली नाही तरी ती आपसूक बनते. काहीवेळा चांगली असते काहीवेळा देशांतर्गत दुर्जनांमुळे किंवा देशाबाहेरच्या हितशत्रूंमुळे वाईटही ओळख बनते. सरकार वेळोवेळी इनक्रेडिबल इंडिया सारख्या जाहिरात मोहीमा करून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचावण्याचे काम करत असते. पण अशा जाहिराती एका ठराविक मर्यादेपर्यन्तच काम करू शकतात. तरीही अशा आंतरराष्ट्रीय जाहिरातींना काही कमी खर्च येत नाही.[१] मग त्यापण करू नयेत का? आता तुम्ही म्हणाल इथे अवकाश मोहिमांचा काय संबंध? आहे. भारताच्या अवकाश मोहीमा हा त्याच्या ओळखीचा, ब्रॅण्डिंग चा भागही आहेत. वैज्ञानिक प्रगती, स्वनिर्मित तंत्रज्ञान, परकीय चलन, भविष्यामधील आव्हानांची तयारी, प्रगत देशांच्या मध्ये मान आणि शत्रुदेशांना धाक या पल