पोस्ट्स

Social लेबलसह पोस्ट दाखवत आहे

धटुकले मोदीजी

इमेज
"आजच्या चांद्रयान 3 मोहिमेतील लँडर उतरविण्याचा जो शेवटचा टप्पा पार पडला त्यात टिव्ही स्क्रीनवर इस्रोचे वैज्ञानिक कमी आणि प्रचार मंत्री मोदीच जास्त का दाखवले जात होते? की ही एक 2014 च्या प्रचाराचा भाग आहे?" कोरा. कॉम वर कोणीतरी हा प्रश्न विचारला आहे. त्या प्रश्नाला माझे उत्तर- या प्रश्नातली खोचकता एक वेळ बाजूला ठेवू. मला देखील एकवेळ वाटले कि अगदी साऊथ आफ्रिकेत महत्वाच्या BRICS परिषदेतून वेळ काढून शेवटच्या मिनिटाला मोदींनी ISRO च्या कंट्रोल सेंटर ची अर्धी स्क्रीन व्यापायची काय गरज होती? ते तिथे असले नसले तरी त्या विक्रम लॅण्डर काही एक फरक पडला नसता. विरोधक म्हणतात तसे "स्वतःचा फोटो काढण्याची" उत्सुकता दुसरे काय? हो ना? पण एक गोष्ट लक्षात घ्या. २०१९ मध्ये मोदी स्वतः चांद्रयान २ च्या वेळी देखील इसरो च्या कन्ट्रोल रूम मध्ये प्रत्यक्ष होते. आणि लॅण्डर फेल गेल्यावर भारतद्वेष्ट्या गँग कडून प्रचंड ट्रोलिंग झाले होते. चांद्रयान ३ च्या वेळी देखील विक्रम लॅण्डर फेल होण्याची भरपूर शक्यता होती. अवकाश आहे ते. भले भले गडी अगदी नासा आणि स्पेसेक्स पासून चीनची CNSA च्या मिशन नियमितपणे...

चिमणी उडाली भुर्रर्र

इमेज
प्रश्न :  संस्कृतवर केवळ ब्राह्मणांचाच अधिकार का राखून ठेवला गेला? ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर समाजाच्या लोकांनी संस्कृत भाषेचा कधीच वापर केला नाही का? भूतकाळातले सोडा या लोकांनी नवीन भाषेवर अधिकार स्थापन केलाय. ---- मी ब्राह्मण समाजातला नाही. ---- मला वाटते "संस्कृतवर केवळ ब्राह्मणांचाच अधिकार होता" हे ना एक ब्लँकेट स्टेटमेंट आहे. म्हणजे एखाद्याला हवा तोच निष्कर्ष काढण्यासाठी केलेले सरसकट विधान. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत बहुजनांमध्ये "शिकून कोणाचं भलं झालंय" हे वाक्य फार प्रचलित होते. म्हणजे एकंदरीत शिक्षणाबद्दल उदासीनताच होती. आणि संस्कृत शिकून कोणी फार मोठा विद्वान वा धनी झाला अशीही परिस्थिती नव्हती. येऊनजाऊन भिक्षुकीची विद्या. एखादी तात्काळ पोटापाण्याची व्यवस्था करू शकणार नाही अशी कला शिकून त्यात पारंगत होणे याला समर्पण वृत्ती लागते. ती ज्यांनी दाखवली त्यात त्यांना कौशल्य प्राप्त होते हे साधे गणित आहे. जिथे बहुसंख्य समाज रोजीरोटीचा मागे लागला होता अशात यात कोण कशाला संस्कृतवर अधिकार वगैरे राखून ठेवणार डोम्बल्याचे. ---- आता गम्मत सांगतो. ५० वर्षांनी हा प्रश्न ज्...

लोक उदरनिर्वाहासाठी व्हिडिओ गेम खेळून पैसे कसे कमवतात?

इमेज
लोक उदरनिर्वाहासाठी व्हिडिओ गेम खेळून पैसे कसे कमवतात? प्रत्येक क्षेत्रामध्ये गुणवत्तेची, कौशल्याची आणि त्यातून होणाऱ्या अर्थार्जनाची उतरंड असते. ज्यांचे कौशल्य जास्त, संधी जास्त, नशीब बलवत्तर असे लोक या पिरॅमिड च्या वरच्या भागात असतात आणि ज्यांच्याकडे या गोष्टी कमी प्रमाणात असतात तसे तसे हे लोक या पिरॅमिड च्या खालच्या भागात असतात जिथे कौशल्य, संधी, नशीबाची साथ यापैकी काहीतरी कमतरता असते आणि त्यामुळे पैसे देखील कमी असतात. क्रिकेटचे उदाहरण घेतले तर काही शे आयपीएल लेवल चे क्रिकेटर सोडले तर क्रिकेट खेळून उदरनिर्वाह चालवतोय असे आपल्या आजूबाजूला कमीच लोक दिसतील. तसेच गेमिंग चे देखील आहे. आधुनिक युगात व्यावसायिक गेमर बनून पैसे कमावणे अगदीच अशक्य नाही. तरी ते एक करियर ऑप्शन होऊ शकते का याबाबत मलातरी शंकाच आहेत. मला वाटते अगदी कुमार वयात करियर निवडताना आवडी बरॊबरच आपण त्या क्षेत्रातील हजारावी, दहा हजारावी, एक लाखावी, दहा लाखावी कुशल व्यक्ती जर झालो तर आपल्याला त्यातून किती अर्थार्जन करता येईल याचा विचार व्हावा. उदाहरणार्थ कुणी अभिनय हा करियर पर्याय म्हणून विचार करत असेल तर पहिल्या दहा अभिनेत...

आधुनिक काळातील शिक्षण आणि रोजगार

इमेज
Quora.com प्रश्न -  आपण शिक्षण का घेतो, शिक्षणावर एवढा पैसा खर्च करून काही उपयोग आहे का? उत्तर -  माझ्या मते पालकांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे जास्त ओढाताण न करता मुलांचे पदवीपर्यंत शिक्षण करावे. पदवी मिळवण्यासाठी कर्ज करून शिक्षणसम्राटांच्या मढ्यावर पैसे घालू नयेत. शिक्षणाचा उपयोग आहे. पण शिक्षण आणि पदवीचे ढेंडोळे यात फरक आहे. आताच्या काळामध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी कौशल्य जास्त महत्त्वाचे आहे. IIT, NIT, IIM सारख्या संस्थेमध्ये पदवी असेल तरच त्या कॉलेज च्या नावाचा काहीतरी उपयोग आहे. आणि या कॉलेजेस मध्ये, बुद्धिमत्तेच्या बळावर ऍडमिशन मिळत असेल तर तो विद्यार्थी पालकांनी थोडा ताण घेऊन शिक्षण पूर्ण करण्याच्या लायकीचा आहे हा एक सरधोपट नियम समजा. या कॉलेजेस व्यतिरिक्त कुठेही फार जास्त पैसे करून शिक्षणाच्या मागे लागू नये. मग काय शिक्षण सोडून द्यायचे? नाही. पदवीपर्यंत शिक्षण वाजवी दरात उपलब्ध आहे अशा संस्थेमधून करावे. वाचलेले पैसे वापरून, पदवी करता करता कोणताही व्यावसायिक कोर्स करावा. प्लम्बर, मेकॅनिक, फर्निचर काम, इलेक्ट्रिशियन, कॉम्प्युटर हार्डवेयर, सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटर असे कोर्स करून...

संघटन शक्तीची गरज काय?

इमेज
संघटन शक्तीची गरज काय? कोरा.कॉम वरील या प्रश्नासाठी माझे उत्तर - ​फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात कंपनीच्या ऑफिशियल चॅट वर सकाळीच एका टीममेट चा मेसेज आला. "Hi Ashish, do you have some time today? need to talk". आजकाल असे मेसेज आले कि कि धस्स होतं. त्यातल्या त्यात उत्कृष्ट काम करणारे सहकारी असतील तर जास्तच. अमेरिकेमध्ये जसे "ग्रेट रेसिग्नेशन" चालू आहे तसे भारतात सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये "ग्रेट स्विच" चालू आहे. लोक कंपन्या बदलतात, दुप्पट तिप्पट पगार वाढवतात. त्यामुळे एखाद्याला टिकवून ठेवणे, किंवा राजीनामा आल्यावर रिटेन करणे म्हणजे महाकठीण काम बनले आहे. आता हा सहकारी, सोयीसाठी त्याला "क्ष" म्हणू कंपनीत जॉईन होऊन फक्त तीन महिने झाले होते. पण पठ्ठा फ्रेशर असूनही कॉलेजमध्ये असतानाच स्वतःहुन कोर्सेस करून आला होता. त्यामुळे खरोखर एक चांगला सहकारी मिळाल्याचे टीम मॅनेजर म्हणून मला आणि बाकी टीमला देखील समाधान होते. अगदी काही दिवसाच्या अवधीतच त्याने कोड बेस समजून नवीन डेव्हलपमेंट देखील सुरु केली होती. संवादकौशल्य देखील उत्कृष्ट होते. नुकताच जॉईन झाल्यामुळे किमा...

विमानाच्या प्रवासात तुम्हाला भेटलेली एखादी चांगली व्यक्ती कोणती? का?

इमेज
विमानाच्या प्रवासात तुम्हाला भेटलेली एखादी चांगली व्यक्ती कोणती? का? सिटीझन केन नावाचा हॉलिवूड चा एक जुना माझ्या आवडीचा चित्रपट आहे. चित्रपट सुरु होतो तेच त्यातला अब्जाधीश वृद्ध नायकाच्या तोंडी शेवटचे शब्द असतात - 'रोझबड'. मृत्यूसमयी तो हे का म्हणाला आणि त्याचा अर्थ काय याविषयी माध्यमांत अंदाज आणि तर्क चालू होतात. नंतरचा संपूर्ण चित्रपट या नायकाची म्हणजे 'चार्ल्स केन' याची जीवनकहाणी आहे. रोझबड म्हणजे काय यासाठी जंग जंग पछाडणारे वार्ताहर नायकाच्या एका जवळच्या मित्राला त्याबद्दल विचारतात त्यावर त्यालाही काही माहित नसते. पण तो त्याचे अनुमान सांगतो की ती एखादी व्यक्ती असेल जी केन महाशयांच्या लक्षात राहिली. यावर त्या वार्ताहराचे समाधान न झाल्याने तो म्हातारा मित्र पुढील गोष्ट सांगतो. मिनिटभराचा हा संवाद हॉलिवूड च्या उत्कृष्ट संवादांपैकी एक आहे. A fellow will remember a lot of things you wouldn't think he'd remember. You take me. One day, back in 1896, I was crossing over to Jersey on the ferry, and as we pulled out, there was another ferry pulling in, and on it, the...

Mail To Team on International Yoga Day

इमेज
Today seemed like a good day to share a thought with you all. I once went out with few friends for a dinner. We were having a nice time. One of the friends mentioned that he wasn't really happy about how his manager treated him. He said that he was not working at his full capacity and was only putting in 30%-40% work because he wanted to make a point. I wasn't sure how to react to that. This strategy might be useful if you are doing manual labor with no prospects of growth. However, in our case, as engineers and analysts, we are literally surrounded by opportunities and growth potential. Each hour we have can be invested in learning and improving skills. We have degrees that are recognized worldwide. He was literally modulating his efforts to punish someone in his imagination. That can serve no purpose other than sabotaging his own growth. So should he just tolerate his manager and keep working at his best? I would say that he should take efforts to articulate his feelings, let...

Corona days and Plasma

इमेज
It's 16th April 2021. We are probably in the peak days of the Covid-19 second wave. Last week my uncle was diagnosed with Covid-19 and he was shifted to a Covid hospital near my cousin's home. The hospital was small and in the next few days, we had to take him to a slightly bigger hospital for a ventilator bed because his condition worsened. The trouble we had to go through getting a ventilator bed and Remdesivir injection could not be explained in a single post. I had never experienced such a situation in my life nor did I imagine that this could happen in my city - Pune. The purpose of this post is about making people aware of getting Plasma. The doctors told us that my uncle would need Plasma for further treatment. His blood group is O+.  For Covid patients, it is not enough to have any Plasma. It has to come from a patient with Covid-19 antibodies. Meaning the donor himself must have been cured of Covid-19 at least before 28 days but not before 4 months. You can imagine the...

अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का

इमेज
भारतासारख्या विकसनशील देशाने अवकाश मोहिमांवर अवाढव्य खर्च करणे योग्य आहे का? आणि का? आपल्या देशाच्या आकारमानाने हा खर्च अवाढव्य नक्कीच नाही. अवाढव्य खर्च हे विशेषण संरक्षण खर्चाच्या बाबतीत योग्य शोभेल. भारताला स्वतःचा अवकाश कार्यक्रम का हिताचा आहे, हे आता सर्वश्रुत आहेच. मी तुम्हाला एक आणखी बाजू सांगतो. कोणत्याही देशाला त्याची ओळख बनवावी लागते. बनवली नाही तरी ती आपसूक बनते. काहीवेळा चांगली असते काहीवेळा देशांतर्गत दुर्जनांमुळे किंवा देशाबाहेरच्या हितशत्रूंमुळे वाईटही ओळख बनते. सरकार वेळोवेळी इनक्रेडिबल इंडिया सारख्या जाहिरात मोहीमा करून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचावण्याचे काम करत असते. पण अशा जाहिराती एका ठराविक मर्यादेपर्यन्तच काम करू शकतात. तरीही अशा आंतरराष्ट्रीय जाहिरातींना काही कमी खर्च येत नाही.[१] मग त्यापण करू नयेत का? आता तुम्ही म्हणाल इथे अवकाश मोहिमांचा काय संबंध? आहे. भारताच्या अवकाश मोहीमा हा त्याच्या ओळखीचा, ब्रॅण्डिंग चा भागही आहेत. वैज्ञानिक प्रगती, स्वनिर्मित तंत्रज्ञान, परकीय चलन, भविष्यामधील आव्हानांची तयारी, प्रगत देशांच्या मध्ये मान आणि शत्रुदेशांना धाक या पल...

ऐकण्याचे कौशल्य

इमेज
"ऐकणे” (लिसनिंग स्किल) हे कौशल्य कसे रूजवतां येईल हा अतिशय चांगला प्रश्न आहे. संवादामध्ये समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेणे हे फार महत्वाचे आहे. जर आपण त्या संवादातून स्वतःच्या जाणिवेमध्ये वृद्धी नाही केली आणि आपले स्वतःचेच आधीच तयार असलेले विचार रेटले तर त्या संवादाचा आपल्याला काय उपयोग? स्वतः शहाणे आहोत हा इगो कुरवाळता येईल, पण काही मूल्यवर्धन होणार नाही. बऱ्याचदा आपण संवाद करताना प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असतो. त्यामुळे समोरचा कधी आपलं म्हणणं संपवतोय याची आपण अधीरतेने वाट पाहतो. त्यामुळे होतं काय की समोरची व्यक्ती नक्की काय म्हंटली हे अर्धेअधिक निसटून जाते. आणि फक्त आपल्याला आधीच अपेक्षित असलेले शब्द, विचार हेच नेमके पकडून त्याच्यावरच आधारित आपले उत्तर देऊन आपण त्या संवादाची दिशा आपल्याला हवी तशी वळवतो. पण हा सुसंवाद नाही. सुसंवादात प्रत्येक व्यक्तीला आपले विचार ऐकून घेतले गेले आणि दुसऱ्याचे विचार समजले अशी भावना आली पाहिजे. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संवादामध्ये चांगले ऐकण्यासाठी हे करायला हवे - १. आपण फक्त प्रत्युत्तर देण्यासाठी ऐकत तर नाही आहोत ना याचे भान ठेवावे. काही सेकंदापु...

स्टॅचू ऑफ युनिटी - फसलेला प्रकल्प का फायद्याची गुंतवणूक?

इमेज
Did the Statue of Unity in India fail? मी २०१९ च्या फेब्रुवारी महिन्यात स्टॅचू ऑफ युनिटी ला भेट दिली. स्टॅचू ऑफ युनिटी बडोद्यापासून साधारण ८० किमी वर असलेल्या केवडीया या छोट्या गावाजवळ आहे. मी तिथे बडोद्यावरून साधारण ५ वाजता पोचलो. तिथे दोन प्रकारचे तिकीट मिळतात. पहिल्या प्रकारचे १२० रुपयांचे तिकीट घेऊन तुम्ही पुतळ्याच्या पायाजवळ जाऊ शकता. दुसऱ्या प्रकारचे तिकीट घेऊन तुम्हाला सरदार पुतळ्याच्या छातीपर्यंत असलेल्या निरीक्षण दालनापर्यंत जाता येते. हे तिकीट ३५० रुपयांना मिळते. मला खरेतर उंचीवर असेलेल्या या निरीक्षण दालनापर्यंत (Observation Deck) जायचे होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही महाग तिकिटे संपली होती. तिकीट खिडकीवरच्या क्लर्क ने सांगितले की ही तिकिटे मर्यादित असतात आणि दिवसाला "फक्त" ७००० तिकिटेच दिली जातात. मी सप्ताहांतात आलो नव्हतो. तो शुक्रवार होता तरीही ही महाग तिकिटे चक्क संपली होती. थोडा हिरमोड झाला, पण माझ्याबरॊबर बरेच लोक होते ज्यांना ही तिकिटे मिळाली नव्हती. नाईलाजाने नॉर्मल तिकीट घेतले. ७००० तिकिटे दर दिवसाला आणि नॉर्मल तिकिटे कितीही. आता तुम्हीच अंदाज लावा. स्...

परोपकार की स्वउपकार?

इमेज
तुम्ही अशी कोणती गोष्ट परोपकार म्हणून केली पण त्याचा तुम्हालाच प्रत्यक्ष फायदा झाला? साधारण २००८ च्या दरम्यान मी एकदा वृत्तपत्रात एक लेख वाचला. त्यात लेखकाने त्यांचा अनुभव कथन केला होता. सामसूम रस्त्यात त्यांचे पेट्रोल संपले आणि एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने स्वतःच्या दुचाकीतील पेट्रोल देऊन लेखकाला मदत केली. जेव्हा लेखक त्या स्वाराला पैसे देऊ लागला तेव्हा त्याने पैसे स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. ते म्हणाले की मोबदला द्यायचाच असेल तर लेखकाने देखील आपल्याबरोबर पाईपचा तुकडा ठेवावा आणि इतर बाईकस्वारांना अडीनडीला मदत करावी. मला ही कल्पना चांगलीच आवडली. मी माझ्या शहरात असे बाइक ढकलणारे लोक बरयाचदा पाहिले होते. माझ्या ऑफिस व घरामधील रस्त्यात 5-6 किलोमीटरच्या परिसरात पेट्रोल पंपच नव्हता. त्या मार्गावर,अशी दृश्ये जवळपास प्रत्येक आठवड्यात दिसायची. मी स्वतःला या अडचणीत एकदा दोनदा सापडलो होतो.चला, एक चांगले पुण्याचे काम करूया या भावनेने मी माझ्या ऑफिस बॅगमध्ये एक सायफन नळी आणि एक छोटी प्लास्टिकची बाटली ठेवण्यास सुरुवात केली. गाडी ढकलून बेजार झालेले, थकलेले, स्वतःला दोष देत चाललेल्या दु...

ते देवाचं असतं !

इमेज
बोल्हाईचे मटण काय असते? पुण्याजवळ वाघोलीच्या पुढे वाडेबोल्हाई हे गाव आहे. तेथील बोल्हाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. पुण्याजवळच्या गावांतील काही कुटुंबांना या देवीचे काही नियम लागू होतात. याला देवी आहे असे म्हणतात. उदाहरण म्हणजे माझ्या कुटुंबाला बोल्हाई आहे. या देवीला शेळी (बेकरीचे) बळी चालत नाही. मेंढी चालते. साहजिकच ज्या कुटुंबाना ही देवी आहे त्यांना बेकरीचे मटन वर्ज्य असते. म्हणजे आमच्या कुटुंबात कधीच शेळीचे मटण खात नाहीत. तसे पाहिले तर मटणच फार कमी वेळा होते पण खाल्लेच तर मेंढीचेच. माझी आजी तर असे म्हणायची की या बोल्हाई असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना शेळीच्या मटणाचे खरकटे पाणी देखील ओलांडायचे नसते. जर शेळीचे मटण खाण्यात आले तर शरीरावर काहीतरी पुरळ, खाज या स्वरूपात प्रतिक्रिया उठतात. नंतर बोल्हाईला जाऊन काहीतरी विधी करावे लागतात. हे असे असल्यामुळे या व्यक्ती शेळीच्या मटणाच्या खानावळी हॉटेल्स टाळतात. त्यामुळे जसे काही हॉटेल्स वर जसे "शुद्ध शाकाहारी" लिहिलेले असते तसे काही ठिकाणी "फक्त बोल्हाई चे मटण" अशी पाटी असते. उद्देश हाच की हे शुद्ध बोल्हाई वाल्या लोकांच...

मला (न) समजलेले बाबा

इमेज
तुम्ही अलीकडे कोणते पुस्तक वाचले आणि त्याबद्दल तुमचा काय अभिप्राय आहे? मी २०१९ च्या मार्च महिन्यात डॉ प्रकाश आमटे जिथे कार्यरत आहेत अशा हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली. बाबा आमटे, त्यांची समाजासाठी आयुष्य अर्पण केलेली डॉ विकास आणि प्रकाश आमटे ही मुले, डॉ भारतीताई आणि मंदाकिनी या कर्तृत्ववान सुना, सेवापरायण परिवार आणि निष्ठावंत, सेवाखोर कार्यकर्ते याबद्दल माहिती नसणारी व्यक्ती विरळाच. (सेवाखोर हा बाबा आमटेंच्या एका कवितेत आलेला शब्द आहे. The one who cannot help but help) चंद्रपूर जवळचे आनंदवन आणि गडचिरोली च्या निबिड अरण्यातले हेमलकसा याबद्दल खूप काही सांगण्यासारखे आहे. ते कधीतरी दुसऱ्या पोस्ट मध्ये. डॉ प्रकाश आमटे यांच्या प्रकाशवाटा ही आत्मकथा मी तिथे जाण्याअगोदरच वाचली होती. तिथे गेल्यावर मी आणखी काही पुस्तके घेतली. त्यात डॉ प्रकाश आमटेंचे हेमलकसा येथील सहकारी आणि बाबा आमटेंसोबत बराच काळ व्यतीत केलेले विलास मनोहर यांची दोन पुस्तके होती. त्यातले नेगल हे पुस्तक मी लागोलाग वाचून काढले. नव्वद च्या दशकात शाळेत असताना हे पुस्तक आमच्या शाळेच्या ग्रंथालयात खूपच विद्यार्थीप्रिय होते....

खनिज तेलाचे ऋण

इमेज
हो. अमेरिकन तेल वायदे बाजारात तेलाची किंमत एका पिंपामागे उणे ३७.६३ डॉलर झाली. पण याचा अर्थ लगेच असा होत नाही कि सामान्य अमेरिकन लोकांना पेट्रोल फुकट मिळेल. ही बातमी वाचताना चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला. नंतर याबद्दल आणखी जाणून घेताना माझा मित्र मुस्तफा, जो कमोडिटी मार्केट मध्ये ट्रेडिंग करायचा त्याचे बोल आठवले.. "जर करार संपण्याच्या आधी लॉट विकले नाहीत तर घरी आणून देतील बरका."* हे उणे तेलाच्या किमतीचे काय प्रकरण आहे हे समजून घेण्यासाठी वायदे बाजार काय असतो हे पाहावे लागेल. ---- समजा सागर एक पोल्ट्रीवाला आहे. त्याच्याकडे   २०२० मार्च महिन्याच्या सुरवातीला १००० पिल्ले आहेत. मे महिन्याच्या शेवटी कोंबड्यांची पूर्ण वाढ होऊन तो कोंबड्या बाजारात विकणार आहे. साधारण १०० रुपये कोंबडीमागे सुटतील अशी त्याला अपेक्षा आहे. कोंबड्या संगोपनाचा खर्च ५० रुपये प्रति कोंबडी येणार आहे. पण सागरला थोडी धाकधूक वाटते आहे कि ५० हजारांची गुंतवणूक करून जर अपेक्षित किंमत आली नाही तर? अशा वेळी तो एक आयडिया करतो. वैभव या कोंबडीच्या व्यापाऱ्याला तो भेटतो. ५०० कोंबड्या मे महिन्यात विकायच्या आहेत असे तो...