आधुनिक काळातील शिक्षण आणि रोजगार
Quora.com प्रश्न - आपण शिक्षण का घेतो, शिक्षणावर एवढा पैसा खर्च करून काही उपयोग आहे का? उत्तर - माझ्या मते पालकांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे जास्त ओढाताण न करता मुलांचे पदवीपर्यंत शिक्षण करावे. पदवी मिळवण्यासाठी कर्ज करून शिक्षणसम्राटांच्या मढ्यावर पैसे घालू नयेत. शिक्षणाचा उपयोग आहे. पण शिक्षण आणि पदवीचे ढेंडोळे यात फरक आहे. आताच्या काळामध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी कौशल्य जास्त महत्त्वाचे आहे. IIT, NIT, IIM सारख्या संस्थेमध्ये पदवी असेल तरच त्या कॉलेज च्या नावाचा काहीतरी उपयोग आहे. आणि या कॉलेजेस मध्ये, बुद्धिमत्तेच्या बळावर ऍडमिशन मिळत असेल तर तो विद्यार्थी पालकांनी थोडा ताण घेऊन शिक्षण पूर्ण करण्याच्या लायकीचा आहे हा एक सरधोपट नियम समजा. या कॉलेजेस व्यतिरिक्त कुठेही फार जास्त पैसे करून शिक्षणाच्या मागे लागू नये. मग काय शिक्षण सोडून द्यायचे? नाही. पदवीपर्यंत शिक्षण वाजवी दरात उपलब्ध आहे अशा संस्थेमधून करावे. वाचलेले पैसे वापरून, पदवी करता करता कोणताही व्यावसायिक कोर्स करावा. प्लम्बर, मेकॅनिक, फर्निचर काम, इलेक्ट्रिशियन, कॉम्प्युटर हार्डवेयर, सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटर असे कोर्स करून...