सध्याचा लॅपटॉप
तुम्ही सध्या कोणता लॅपटॉप वापरत आहात?
मी सध्या डेल चा G15 5511 गेमिंग लॅपटॉप वापरत आहे. लॅपटॉप गेमिंग चा असला तरी याच्यावर अजून तरी कुठलीच गेम खेळलो नाही. मला ग्राफिक्स साठी बरा असा लॅपटॉप पाहिजे होता. याचे स्पेसिफिकेशन्स चांगले आहेत. जून २०२२ मध्ये घेतला तेव्हा ७२ हजाराच्या आसपास किंमत होती.
Intel I5-11260H 16Gb, 512Gb, Nvidia RTX 3050 (4Gb GDDR6)
Canva, Blender 3D, Movavi Video editor असे सॉफ्टवेयर बऱ्यापैकी वापरतो. आणि या लॅपटॉपवर ते चांगले चालतात.
Blender अक्षतच्या डिझाइन्स साठी वापरले आहे. Canva आणि Movavi देखील ऍड कॅम्पेन
साठी वापरतो.
बाकी डेल ची बिल्ड क्वालिटी इतर इतर लॅपटॉप्स पेक्षा चांगली आहे असा माझा अनुभव आहे. २००८ मध्ये माझा पहिला डेल स्टुडिओ १५५५ हा लॅपटॉप घेतला. एक दोन वेळा बॅटरी आणि इतर किरकोळ दुरुस्त्या वगळता अजूनही चालू आहे. पण मी तो आता वापरत नाहीये. माझ्याकडे एक लो एन्ड लेनोवो लॅपटॉप देखील होता पण त्याचा कधी भरवसा वाटला नाही.
सध्याच्या G15 5511 बॅटरीचा एक मोठा प्रॉब्लेम आला होता. पण १ वर्षाच्या फ्री सर्व्हिसिंग मध्ये दुरुस्त केला गेला. बाहेर वागवण्यासाठी थोडा जड आहे. बाकी काहीच तक्रार नाही. जर पाठीवर घेऊन खूप फिरावे लागणार असेल तर माझ्या मते हा लॅपटॉप न घेणे उत्तम. थोडा वजनाला हलका पाहावा. हा लॅपटॉप घेऊन दुचाकीवर जाणे जीवावर येते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!