राम-लीला : नाय पाह्यला तर ताप आन बघून पश्चात्ताप.
जास्त गाजावाजा केलेले पिच्चर पहिल्याच दिवशी पाहायचे म्हणजे मोठी रिस्क असते. मी सहसा त्यांच्या वाट्याला जात नाही. पण लडिवाळ आग्रह मोडू नये असा एक नियम असल्याने.. (म्हणजे असे कितीसे प्रसंग येतात हो.. नाहीका?) मी घेतली रिस्क. आणि पाहिला "गोलीयोंकी रासलीला: राम-लीला" असे अवघडलेले नाव झालेला सिनेमा. आता सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर- रामलीला असे साधे सुंदर नाव बदलायला लागण्याएवढे काही या पिक्चर मध्ये काही वाईट आहेका? की हा उगीच आपल्या उपटसुंभ संस्कृतीरक्षकांचा निव्वळ उथळपणा? काल हापिसात जेव्हा याच्यावर खलबत चालू झाले तेव्हा मी उसळून म्हणालो होतो की "कलाकृती कशी असावी आणि त्यात काय टाकावे याचे लायसेन्स देण्याएवढा हिंदू धर्म तालिबानी झालाय का?" (टाळ्या.. शिट्ट्या.. धन्यवाद!) मी माफी मागतो त्या उपटसुंभ संस्कृतीरक्षकांची. बिचारे, त्यांनी हा पिच्चर रीलीस होऊ दिला यात उलट आपल्या हिंदूधर्मीयांची अफाट क्षमाशीलता दिसून येते. फक्त नावावर भागवले? वाह.. वाह.. पिच्चर च्या पहिल्या पंधरा मिनिटात हनुमान आणि कृष्णाच्या वेशभूषेतले एक्स्ट्राज् साउथ इंडियन स्टाईल राडा डांस...