विरळ आणि संस्मरणीय
तुम्ही अशी कोणती नैसर्गिक घटना अनुभवली जी इतकी विरळ आहे की परत ती बघणे होणार नाही असे तुम्हाला वाटते? 1. सिंहेचा उल्कावर्षाव हा उल्कावर्षाव दरवर्षी 17 नोव्हेंबर च्या पहाटे दिसतो. टेम्पल टटल हा धूमकेतू दर काही दशकांनी सुर्याजवळ येतो. या धूमकेतूने मागे ठेवलेल्या कणांमधून पृथ्वी जाते तेव्हा हे कण आणि कधीकधी मोठे दगड पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. हा उल्कावर्षाव दरवर्षी जरी घडत असला तरी काही दशकांमध्ये याचा जोर जास्त असतो. धूमकेतू जर अलीकडेच सुर्याजवळ येऊन गेला असेल तर आकाशात आतषबाजी सारख्या उल्का दिसू शकतात. साल 1998 का 99 ला नक्की आठवत नाही. जगभरात या वर्षी leonids shower जबरदस्त होणार म्हणून उत्साह होता. मी माझ्या एका मित्राला तयार केले आणि 17 नोव्हेंबर च्या रात्री 3 वाजताच्या दरम्यान आम्ही अंधाऱ्या परेड ग्राउंडवर पोचलो. सुरवातीला मान वर करून पाहत होतो पण थोड्या वेळातच ओणवे व्हायची वेळ आली. पावसा सारख्या नाही पण मिनिटाला 4–5 उल्का पाहिल्याचे आठवते. आम्ही काही तास तो सोहळा पाहिला. त्या रात्रीनंतर मी कधीही एवढ्या मोठया प्रमाणात उल्का पहिल्या नाहीत. Leonids - Wikipedia 2. ' तोतापुर...