केल्याने भाषांतर - २
केल्याने भाषांतर - १ च्या पुढे - हनुमानाची श्रीरामावर अतूट श्रद्धा असण्यामागे काय कारण होते? हनुमान वानरांमध्ये अतिशय बुद्धिमान, प्रामाणिक आणि बलशाली होता. त्यामुळे त्याच्या एवढा किंबहुना जास्त योग्य असा गुरु वा आदर्श त्याला त्याच्या बालपणी मिळाला नाही. रामायणात हनुमांचे दत्तक पिता केसरी यांचा क्वचित उल्लेख आढळतो. यावरून मारुतीला वडिलांचे फार मार्गदर्शन लाभले असे दिसत नाही. त्यामुळे आपल्या खर्या शक्तीची प्रचीती त्याला लहानपणी आली नसावी. युवा मारुतीला आधी वाली आणि नंतर सुग्रीवाचे मार्गदर्शन मिळाले असावे. पण या दोघांपैकी कुणीही अतिशय प्रामाणिक आणि नैतिक अशा मारुतीवर प्रभाव पाडू शकला असावा असे वाटत नाही. जेव्हा मारुती श्रीरामाला भेटला, त्याला आपण आयुष्यामध्ये काय शोधत होतो याची तत्क्षणी प्रचीती झाली. वानर जमातीला अयोध्येच्या साम्राज्याची कल्पना होती, पण या साम्राज्याचा सर्वेसर्वा इतका विनयशील असावा अशी त्यांनी कधी कल्पना केली नव्हती. श्रीरामामध्ये असलेली दया, मृदुता, प्रामाणिकता आणि शौर्य मारुतीला आधी कोणातही दिसले नव्हते. अशा जगामध्ये जिथे भाऊ भाऊ एकमेकांच्या जीवावर उठले...