तुझे सब है पता..
नियती आपल्यापुढे कुठले ताट मांडून ठेवेन सांगता येत नाही. आज ऊन उद्या पाउस (पुणे वेधशाळेच्या हवाल्याने), आज राम-'अवतार' उद्या रा-वण (SRK च्या कृपेने).. चालायचेच. असे कितीतरी चढउतार पहिले असतील.. बऱ्याच जणांनी. आमच्या आयुष्यात मात्र असले काही नाट्य होत नाही. आमचे जगणे गेले ४-५ वर्षे कीबोर्डचा (कॉम्प्युटरच्या) नाद करण्यात चालले आणि सॅम काकांच्या कृपेने आणखी किती वर्षे जाणार ते त्यांनाच माहिती. उजव्या हाताचा अंगठा पंजाला जिथे मिळतो तिथे दुखायला लागलंय. म्हंजे हाताला विकार येईपर्यंत कुणी कीबोर्ड बडवू शकते का? या माझ्या बालपणीच्या शंकेला प्रात्यक्षिक देवून उत्तर देण्यात आलय. मागच्या आठवड्यात kudos [१] मिळाले. हे kudos म्हंजे आमच्या कंपनीमधले दर्जा कामासाठी देण्यात येणारे सर्वात कनिष्ठ दर्जाचे पारितोषिक आहे. कंपनीतल्या जवळ जवळ ८० टक्के लोकांना मिळते. हे अवार्ड मिळाले सांगितले, तर हसतात.. आणि नाही सांगितले तर "च्यायला, kudos तर मिळालाय पण अकड जशी चम्पुची" हे पण ऐकवतात. ('चॅम्प' हे आणखी एक अवार्ड. kudos "भोकरवाडीची आशा" पुरस्कार असेल तर 'च...