पोस्ट्स

Russian लेबलसह पोस्ट दाखवत आहे

चिमणी उडाली भुर्रर्र

इमेज
प्रश्न :  संस्कृतवर केवळ ब्राह्मणांचाच अधिकार का राखून ठेवला गेला? ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर समाजाच्या लोकांनी संस्कृत भाषेचा कधीच वापर केला नाही का? भूतकाळातले सोडा या लोकांनी नवीन भाषेवर अधिकार स्थापन केलाय. ---- मी ब्राह्मण समाजातला नाही. ---- मला वाटते "संस्कृतवर केवळ ब्राह्मणांचाच अधिकार होता" हे ना एक ब्लँकेट स्टेटमेंट आहे. म्हणजे एखाद्याला हवा तोच निष्कर्ष काढण्यासाठी केलेले सरसकट विधान. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत बहुजनांमध्ये "शिकून कोणाचं भलं झालंय" हे वाक्य फार प्रचलित होते. म्हणजे एकंदरीत शिक्षणाबद्दल उदासीनताच होती. आणि संस्कृत शिकून कोणी फार मोठा विद्वान वा धनी झाला अशीही परिस्थिती नव्हती. येऊनजाऊन भिक्षुकीची विद्या. एखादी तात्काळ पोटापाण्याची व्यवस्था करू शकणार नाही अशी कला शिकून त्यात पारंगत होणे याला समर्पण वृत्ती लागते. ती ज्यांनी दाखवली त्यात त्यांना कौशल्य प्राप्त होते हे साधे गणित आहे. जिथे बहुसंख्य समाज रोजीरोटीचा मागे लागला होता अशात यात कोण कशाला संस्कृतवर अधिकार वगैरे राखून ठेवणार डोम्बल्याचे. ---- आता गम्मत सांगतो. ५० वर्षांनी हा प्रश्न ज्...

Why do we need Sanskrit today

इमेज
The following post is part of my answer to the question on Quora around April 2018- Why do we need Sanskrit today? Why is the BJP government trying to bring Sanskrit back? The original question mentioned Brahmanism in the context so, my answer addresses questioner that concern as well. _*_ Why do we need Sanskrit today? Answer - We don’t need it. Sanskrit as most of the languages in the world is almost extinct. There must be a few hundred people who are using it for communication. Then why to learn such a useless language? Language is part of the culture. It’s part of people. As a society, have we left learning how to paint just because we now have much-advanced cameras and printers that we do not need to paint anymore? Have we stopped learning basic math because we have calculators and computers now? Have we stopped learning Kathak, Bharatnatyam, Kuchipudi, and Bhangra because most of the world does not even care about it? Have we stopped conserving our endangered ani...

केल्याने भाषांतर - १

इमेज
भाषेचा मला आहे लळा. नाही म्हणजे १ वर्ष जर्मन, १ वर्ष रशियन, ६ महिने पोलिश, साधारण इयत्ता पाचवीपासून इंग्रजीवर वर्चस्वासाठी चाललेली झुंज, श्लोक स्पष्टपणे वाचता येती एवढे संकृत असा सगळा एकूण चिवडा झाला आहे. हिंदी वाल्यांना त्यांच्यात भाषेत गप्प करण्याएवढी हिंदी बरी आहे. एक तरी परकी भाषा अस्खलित बोलता यावी हे अजूनही ध्येय आहेच. बर्याचदा हॉलीवूड पिच्चर मध्ये कुणी जर्मन, रशियन किंवा पोलिश बोलले आणि त्यातले २-३ शब्द जरी कळले तर काय जाम भारी वाटते. किंवा घरामध्ये पूजा असताना संस्कृत श्लोक न अडखळता वाचल्यावर घरातले कौतुकाने बघतात तेव्हा जरा हुरूप येतो. संस्कृत आणि रशियन, पोलिश, जर्मन यांच्यातल्या साम्याविषयी ऐकून होतो. पण त्याची स्वतः प्रचीती जेव्हा घेतली तेव्हा जो आश्चर्यमिश्रीत आनंद झाला त्याला तोड नाही. ज्ञान पण चक्रवाढ व्याजाप्रमाणे असते म्हणे. म्हणजे अज्ञानही तसेच असणार. मग नक्की माझे ज्ञान वाढतंय की अज्ञान? असो.. मराठी माझी चांगली आहे. पण आता इंग्लिश चा एवढा शिरकाव झालाय की शुद्ध मराठी बोलले की लोक भुवया वर करतात. काहींना तर हसू आवरत नाही. लहानपणी माझी फार गोची व्हायची. शाळा भाव...

इंटेलिजंट स्पर्म!

इमेज
April 2012 बॉस, काहीतरी भयानक जादू झालीये. हा एप्रिल चालुये आणि आतापर्यंत या वर्षात मी तीन हिंदी सिनेमे पाहिले. ते तीनही प्रस्थापित हिंदी सिनेमाच्या समजुतींच्या पार गेले आणि एक नवीनच शाळा (school of thought) भरवलीये. पानसिंग तोमर, कहाणी आणि विकी डोनर हे नितांत सुंदर पिच्चर पाहिले. हिंदी पिच्चर बेचव आणि बिनडोक अशा समजुती घेवून वर तोंड करून हिंडणाऱ्या लोकांना (म्हणजे आम्हालाच) भयानक धक्का होता हा. नशीब आमचे की हाउसफुल सारखे सिनेमे मधेमधे येवून तो समज अगदीच खोटा नाहीये अशी सांत्वना देतात. वर नमूद केलेल्या तीनही सिनेमांचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यांच्यात कोणीही 'तुर्रम'खान नव्हता. तरीही पानसिंग आणि कहाणी तुफान चालले. आणि विकी डोनर मला एवढा आवडलाय की ज्या अर्थाने हे दोन चालले तो पण बॉक्स ऑफिस गाजवणार यात शंका वाटत नाही. पानसिंग ला काही मोठे बजेट नव्हते पण तरीही ४०-५० वर्षांचा काळ २-२.३० तासात दाखवण्यात लैच कमाल केली. कोलकात्याला ज्या प्रकारे दाखवलय त्याला तोड नाही. हे सिनेमे कुणी लिहिले, कुणी दिग्दर्शित केले हे इथे कशाला लिहू? विकी आहेच. पण या लोकांचे कौतुक करावे तेवढे थोडे. विकी ड...