संस्मरणीय जून - २
संस्मरणीय जून - १ वरून पुढे.
माथेरान
अगदी अवचीत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात गेलो इथे शनिवारी. सोबत ३ उझबेक, एक इरिट्रिया (पूर्व आफ्रिका, इथिओपिया च्या जवळ) ची मुलगी, आणि प्रवीण.
आम्हाला वासरात लंगडी गाय रशियन माहित असल्याने त्यांच्या सोबत एका कार्यक्रमाचे आमंत्रण होते तिथल्या एका शाळेत. यांचे अनुभव ऐकणे, हास्यविनोद, घोड्यावरची रपेट, माथेरानचा धो धो पाउस यात हा प्रवास मस्त झाला.
"हळद लावते किंचित, कुंकू लावते ठसठशीत,
हेमंतराव माझे पूर्वसंचित"
"याला म्हणतात नाव, नाहीतर आपले बघा भांड्यांचे दुकान! म्हणे स्टीलची वाटी." - इति सुमित.
सगळीकडे हशा पिकला.
बदगी
आजीला परत घ्यायला गेलो (मागच्या पेट्रोलच्या पोस्ट मध्ये दुसऱ्या दिवशी सोडायला गेलो होतो). जूनचा चवथा आठवडा. बदगी हे पिंपरी पेंढार पासून साधारण १५ कि.मी. वर आळेफाटापासून २५ कि.मी. वर असलेले दुर्गम खेडे. तिथे पाळीव कुत्र्यांच्या गळ्यात काटेदार लोखंडी पट्टा घालतात. कारण-वाघाने धरू नये म्हणून.
मला इथे गाडी चालवायला लय म्हंजे लय आवडते. वळणावळणाचे रस्ते आणि सभोवताली शेते आणि डोंगर. सोबत आजी असली तर "ते आम्ही तिथे घळीत पाणी प्यायला जायचो, तिथे मला वाघ दिसला होता, कोण कुठला म्हातारबा तिकडं पडून गेला, माझी नणंद, भावजय अमकी तमकी तिथे राहायची, ते मळाबाईचे देऊळ, तो चारणबाबा-त्याच्यापुढे प्रसाद म्हणून तंबाकू ठेवतात" असले किस्से सांगत प्रवास घडतो. यावेळी सोबतीला रिमझिम पाऊसही होता.
टिंग्याचे शूटिंग याच परिसरात झालंय.
असा होता माझा फुल पॅक्ड जून. मजा केली एकंदर!

हेमचंद्रांचे लग्न होते इथे जूनच्या तिसऱ्या आठवड्यात. पुणे भुसावळ हा जवळपास ५०० किमी चा प्रवास आम्ही (सुमित, निखिल, मुस्तफा, कुणाल) स्लीपर बसने केला. येता-जाता दोन्ही वेळी रात्रीचा प्रवास, मोठी बेड आणि बसही आरामदायक असल्याने गप्पाष्टकांना उधान. बेन्डीचे लग्न पण सुंदर झाले. लग्नावारून येवून लगेच माझ्या क्यामेर्यातल्या फोटो आणि विडीओचे संकलन करून मी एक छानशी क्लिप बनवून सगळ्या मित्रांना शेयर केली.
लग्नात बेन्डीला नाव घ्यायला सांगितले तर गडी लगेच तयार झाला. म्हंजे नक्कीच तयारी करून आला असेल या समजुतीने आम्ही कान टवकारले तर बेंडीने हे नाव घेतले-
"वाटीत वाटी स्टील ची वाटी
वाटीत वाटी स्टील ची वाटी,
अर्चनाचे नाव घेतो धरून तिची अंगठी"
जमलं नाही जमलं नाही म्हणून लगेच लोकांनी वहिनीकडे मोर्चा वळवला.
वहिनी-
लग्नात बेन्डीला नाव घ्यायला सांगितले तर गडी लगेच तयार झाला. म्हंजे नक्कीच तयारी करून आला असेल या समजुतीने आम्ही कान टवकारले तर बेंडीने हे नाव घेतले-
"वाटीत वाटी स्टील ची वाटी
वाटीत वाटी स्टील ची वाटी,
अर्चनाचे नाव घेतो धरून तिची अंगठी"
जमलं नाही जमलं नाही म्हणून लगेच लोकांनी वहिनीकडे मोर्चा वळवला.
वहिनी-
"हळद लावते किंचित, कुंकू लावते ठसठशीत,
हेमंतराव माझे पूर्वसंचित"
"याला म्हणतात नाव, नाहीतर आपले बघा भांड्यांचे दुकान! म्हणे स्टीलची वाटी." - इति सुमित.
सगळीकडे हशा पिकला.
बदगी
आजीला परत घ्यायला गेलो (मागच्या पेट्रोलच्या पोस्ट मध्ये दुसऱ्या दिवशी सोडायला गेलो होतो). जूनचा चवथा आठवडा. बदगी हे पिंपरी पेंढार पासून साधारण १५ कि.मी. वर आळेफाटापासून २५ कि.मी. वर असलेले दुर्गम खेडे. तिथे पाळीव कुत्र्यांच्या गळ्यात काटेदार लोखंडी पट्टा घालतात. कारण-वाघाने धरू नये म्हणून.
माझी मावशी राहते तिथे. आणि आजीचे माहेरही हेच. तिथे मुक्कामी एस. टी. जाते. १-२ वर्षापूर्वी एकपदरी डांबरी मार्ग बांधला तिकडे जाणारा.मस्तच जागा आहे.. गावाला शहराची अवकळा नाही आली अजून.
मला इथे गाडी चालवायला लय म्हंजे लय आवडते. वळणावळणाचे रस्ते आणि सभोवताली शेते आणि डोंगर. सोबत आजी असली तर "ते आम्ही तिथे घळीत पाणी प्यायला जायचो, तिथे मला वाघ दिसला होता, कोण कुठला म्हातारबा तिकडं पडून गेला, माझी नणंद, भावजय अमकी तमकी तिथे राहायची, ते मळाबाईचे देऊळ, तो चारणबाबा-त्याच्यापुढे प्रसाद म्हणून तंबाकू ठेवतात" असले किस्से सांगत प्रवास घडतो. यावेळी सोबतीला रिमझिम पाऊसही होता.
टिंग्याचे शूटिंग याच परिसरात झालंय.
असा होता माझा फुल पॅक्ड जून. मजा केली एकंदर!
@ Matheran: Nobody would have mind the few close-up shots of the beautiful nature you had for company..I think I am subtle enough to not rough up the feathers and still able convey the message. ;)
उत्तर द्याहटवा@ Hemant wedding: As a Metallurgist by education, I will have to support( with authority) that in-fact वाटीत वाटी स्टील ची वाटी.
No doubt. There is no other engineering material as important as that of steel. So I dont understand what you guys were objecting on?...
@Badgi : Again there is one tech mistake here
कारण-वाघाने धरू नये म्हणून
- I think you mean leopard( Bibtya)
मस्त प्रवास झालेला दिसतोय. फोटो एकदम जबराट!
उत्तर द्याहटवाdhanyawad Mustafa. patil bagha :-) pan @Matheran baddal kay boltoy tikadehi laksha dya.
उत्तर द्याहटवामुस्तफा, हेमंत,
उत्तर द्याहटवाप्रतिसादासाठी आभार.
तुमच्या युक्तीवादावरून बिरबलाची ती गोष्ट आठवली - बादशाहाच्या सर्वात श्रेष्ठ फूल कोणते या प्रश्नाला बिरबल 'कापसाचे' हे उत्तर देतो. कारण का? तर ते सर्व मानवजातीची कापडाची (त्या काळी तरी, रेशीम सोडून, पण रेशीम काही बहुजनांचे वस्त्र नव्हते) गरज भागवते.
लॉजिक बळकट असले तरी आजतागायत कुणा प्रियकराने त्याच्या मैत्रिणीसाठी कपाशीची बोंडे आणलेली ऐकिवात नाही. 'श्रेष्ठ' आणि 'सुंदर' यात घोळ झालेला दिसतोय.
उद्या बेन्डीने बायकोला वाढदिवसाला सत्ते पे सत्ता च्या अमिताभने हेमा मालिनीला आणला तसा कलिंगड देवू नये म्हणून त्यांना वेळीच आवरा. :D
माथेरान काही शेवटचे डेस्टिनेशन नाही, त्यामुळे वाट पहा. :)
राज,
रोज रोज च्या आयुष्यात हे प्रवास थोडे चैतन्य आणतात खरे. पण कधीकधी उलट होते. म्हणजे जिथे गेलोय तिथे मन भरले नाही तर काहीतरी मागे ठेवून आल्यासारखे वाटते. हे मला नेहमीच जाणवायचे, कधी एक दोघांना सांगून पण पाहिले. "ह्या असं कुठं असते का, सुट्टी नेहमीच रिचार्ज करते" वगैरे सूर असायचा. पण हा खालचा लेख वाचनात आला तेव्हा एकदम Rumpelstiltskin effect जाणवला. http://www.inc.com/jessica-stillman/case-against-taking-a-vacation.html