पोस्ट्स

म्हणे आम्ही बिझी झालो-२

इमेज
भाग १ पासून पुढे.  Septermber 2012 मराठी मालिकांनी कहर केलाय. त्याच टिपिकल सास बहु टाईप कथा. पण त्या कमी म्हणून आता बऱ्याच मालिकांत भुताटकी, चेटूक वगैरे वगैरे दाखवायला लागलेत. विरोधाभास बघा- माझे वडील वेळ घालवायला पुस्तके शोधून काढतायेत आजकाल. त्यांना मला कधीकाळी ६वी - ७वीत असताना बक्षीस मिळालेले नरेंद्र दाभोळकरांचे 'श्रद्धा-अंधश्रद्धा' हे पुस्तक मिळाले. ते हातात घेवून ते ती भुक्कड अंगात आलेली "सुवासिनी" बघतात. आता तर कहर झालाय. एकापाठोपाठ "देवयानी", "सुवासिनी", "स्वप्नांच्या पलीकडले" असा रतीब चालुये. तरी बरं माझ्या काका-काकूंकडे फेमस असलेले "पुढचं पाउल" ने इकडे घरात अजूनतरी पाउल ठेवलं नाहीये. या मालिकांमुळे माझे टीवी बघणे महिन्याच्या ३-४ तासांवर आले आहे (अतिशयोक्ती नाही). डिस्कवरी पूर्णपणे गायब झालीये. नॅट-जिओ चा आवाज क्षीण होत गेला. या डेली सोप मालिका जरी महिन्याभरानंतर पाहिल्यातरी तसूभर हललेल्या नसतात. पण आईला म्हटले की हा एवढा पिच्चर बघुदे तर ती म्हणते की "काय तेच तेच पाहतो रे? मला एवढे बघुदे, आज अमकी ...

म्हणे आम्ही बिझी झालो-१

इमेज
September 2012 आजकाल वेळ कुणाकडे आहे? सकाळी लवकर ऑफिसला जायचे, संध्याकाळी उशिरा यायचे. या महिन्यात दिवसातले तेरा तास मी घराबाहेर असतो आणि तरीही हा महिना त्यातल्या त्यात आराम होता. अशा वेळी घरात बोलायला, सण समारंभ साजरे करायला काय जीव असणारे? आमची पिढी वाया गेली. थोरामोठ्यांचा आदर नाही, देवधर्म नाही, नातीगोती नकोत, भावना नकोत. मित्रांना थातुरमातुर भेटायचे, आठवडी बीयर मारायची, महिन्याभरातून कुठेतरी भटकून यायचे, घरकामाला हात नाही, कुटुंबासाठी चार क्षण नाहीत. हड.. च्यायला वरच्या परिच्छेदातल्या गोष्टी १०० टक्के खऱ्या असतीलही पण तरीही एकांगी आहेत. म्हणे आम्हाला वेळ नाही. मी म्हणतो आमच्या कुटुंबाला आमच्यासाठी वेळ नाही. साधारण १०-१२ वर्षापूर्वी भारतातल्या सुखी कुटुंबव्यवस्थेत एकता कपूर नावाच्या चेटकिणीचा प्रवेश झाला . तिच्यावरच गरळ का, तर तिने लावलेली विषवल्ली आज सर्वदिशा व्यापून उरलीये. जिकडे तिकडे त्या डेली सोप मालिकांनी नुसता हैदोस घातलाय. माझ्या आईने त्या सुमारास "कहाणी घर घर की" बघायला सुरुवात केली. तेवढीच तिला करमणूक म्हणून मला आठवतंय त्याप्रमाणे मी, बाबा, अ...

पुण्याला शाप-PMPML

इमेज
पुणे शहराची वाट लागली आहे हे सांगण्यासाठी आता अगदी मकेंझी लावण्याची गरज नाही. जमिनीच्या किमती अवाच्या सवा वाढायला लागल्यावर पुणे मागे पडायला सुरुवात झाली. मागे यासाठी की ज्या पद्धतीने पुण्याचा विस्तार होतोय आणि पायाभूत सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष झालंय ते पाहता पुणे आता आपली गमावलेली पत मिळवणार नाही. मला हा साक्षात्कार एकदम का झाला असा प्रश्न पडू शकतो. नाही, मी सिंगापूर, शांघाय किंवा कुठल्याही पाश्चात्य देशात जावून आलो नाही. मी जवळ जवळ गेले वर्षभर बँगलोर ला होतो. असे म्हणतात की बँगलोर बरेच पुण्यासारखे आहे. मलापण हे साम्य जाणवले. त्याच शासकीय संस्था, कॅन्टोनमेंट चे प्रभाग, मोठ्या शिक्षण संस्था, नवी जन्मलेली आयटी पिढी. पण बँगलोर वाढले. नुसतेच वाढले नाहीये, तर सजग पणे वाढले. तिथे आजिबात ट्राफिक जाम नाही? आहे. पण लवकरच ते सुरळीत होईल. तिथे मोठाले शंभर फुटी रोड आहेत. जागोजागी फ्लायओवर बांधले जातायेत. मेट्रो पूर्णपणे कार्यान्वित होईल तेव्हा बंगलोरची वाहतूक ही भारतातल्या इतर शहरांना आदर्श ठरणार यात मला मुळीच शंका नाही. कुठल्याही शहराची वाहतूक व्यवस्था हा त्या शहराचा कणा असतो. मा...

आईस एज : मैत्र जीवांचे - २

इमेज
आईस एज - हिमयुग ही भौगोलिक अवस्था आहे, ज्यामध्ये पृथ्वीच्या तापमानात लक्षणीय रित्या घट होऊन हिमनद्या आणि धृवीय बर्फाचा विस्तार वाढतो. सिद्धांतानुसार पृथ्वीमाईच्या आतापर्यंतच्या आयुष्यात अशी अनेक हिमयुगे होऊन गेलीयेत. ही तापमानाची घट मनुष्याच्या आयुष्यात जाणवेल एवढ्या वेगाने होत नाही. आणि जर झाली, अगदी २-३ दिवसात झाली, तर काय होईल हे पाहायचे असेल तर "डे आफ्टर टूमॉरो" सारखा सिनेमा बघा. "आईस एज" या सिनेमानेही ही 'तापमानाची त्वरित होणारी घट' संकल्पना त्याच्या पटकथेत वापरलेली आहे. कथा घडते ती हजारो वर्षांपूर्वी. मॅनी हा थोडासा एकलकोंडा आणि विरक्त मॅमथ प्राण्यांच्या लोंढ्यातून वाट काढत चाललेला आहे. हे प्राणी आहेत हिमयुग येणार म्हणून भीतीपोटी स्थलांतर करणारे प्रागैतिहासिक काळातले. एका कड्याजवळ उभा असताना, त्याच्या पायाला सिद येवून धडकतो. हा सिद आहे एक स्लॉथ , ज्याला सोडून त्याच्या कुटुंबाने पलायन केलंय. का? ते आपल्याला लगेच कळतं. सिदला माकडचाळे करून संकटात पडून घ्यायची खोड असते. अस्सं हे अतिशहाणं बाळ आपल्याला त्रास करू नये म्हणून त्...

आईस एज : मैत्र जीवांचे - १

इमेज
तुला कार्टून्स आवडतात का? हा कुणाशीही संवाद साधताना माझा पेटंट प्रश्न झालाय. त्यात जर पोरी-बाळींशी बोलत असेल तर या प्रश्नाला जोडून "प्लीज टॉम अॅन्ड जेरी नको म्हणू हं" अशी काहीशी खवचट पुस्ती जोडतो. माझ्या संवादाचे पण असे ठराविक पॅटर्न तयार झालेत? माझ्या पिढीच्या अनेकांसारखा कार्टून्स शी माझा परिचय मोगली, टॉम अॅन्ड जेरी, अलादिन या दूरदर्शन वर प्रसारित होणाऱ्या मालीकांपसूनच झाला. नंतर जशी २००० च्या आसपास घरी केबल आली तसे मग कार्टून नेटवर्क वरच्या मालिकांचा मी भक्त झालो. मला तद्दन लहान मुलांचे डेक्स्टर्स लबोरेटरी, पॉवर पफ गर्ल्स, स्कूबी डू, करेज द कॉवर्डी डॉग, ट्वीटी अॅन्ड सिल्वेस्टर मिस्टरीस, रोड रनर-कायोटी, द फ्लिनस्टोन्स हे शोस आवडायचे पण टीनटीन, जस्टीस लीग, जॉनी क्वेस्ट, स्वाट कॅट्स, जी आय जो हे माझे प्रेरणास्थान होते. आताचे आणि तेव्हाचे कार्टून नेटवर्क मध्ये जमीन अस्मानाचा फरक पडलाय. कार्टूनच्या दुनियेला त्या जपानी अॅनिमे, पोकिमॉन वाल्यांनी पूर्ण कीड लावली. आजकाल जिकडे तिकडे ही कार्टून्स बघून एखाद्या सैगलच्या चाहत्याला कुमार सानुची गाणी ऐकून केवढे दु:ख झाले असे...