पोस्ट्स

मै और मेरी तन्हाई

इमेज
हा लेख मराठी Quora.Com वर खालील प्रश्नाच्या उत्तरादाखल लिहिला होता. जमून आल्यामुळे इथे ब्लॉग वर सुद्धा पोस्ट करत आहे. तुम्हाला जेव्हा एकट एकट वाटते तेव्हा तुम्ही काय करता? या प्रश्नावर बाकीची उत्तरे बघितली पण तितकीशी पटली नाहीत. "एकटे असणे" आणि "एकटे वाटणे" यात गफलत झालेली दिसते. काही लोकांना एकांत आवडतो आणि काहींना माणसांची वर्दळ. पण दोन्ही प्रकारच्या लोकांना माणसांचा सहवास लागतोच. एकटे असणे म्हणजे आजूबाजूला सहवासासाठी कोणीच नसणे. पण अगदी माणसांच्या गर्दीत देखील एकटे "वाटू" शकते. ही भावना खरेच वेदनादायी असते. आपल्यासाठी कोणाकडे वेळ नाही, आपल्याला कोणीही समजून घेत नाही अथवा घेऊ शकत नाही ही भावना कधीही निर्माण होऊ शकते. माझ्या अनुभवाप्रमाणे अशी भावना निर्माण होते त्यावेळी दोन शक्यता असू शकतात. एक म्हणजे खरोखर तुम्ही एकटे पडला आहात. म्हणजे नातेवाईक, मित्र यांच्यापासून दुरावा निर्माण झाला आहे. दुसरी शक्यता म्हणजे ही मनाची एक तात्पुरती अवस्था आहे. लहान असताना या तात्पुरत्या अवस्थेचा खूप त्रास व्हायचा. मित्र, भावंडं, कुटुंबीय सर्व जण असूनही मल...

गुणांचे बलाबल की दैवाची सूत्र : DNA

इमेज
आज रविवार 1 डिसेंबर 2019 या दिवशी मी ऍमेझॉन प्राईम वर दुपारी "DNA" हा मराठी चित्रपट पाहिला. तळटीपांमध्ये ट्रेलर आणि प्राईम ची लिंक दिली आहे. पुढील उत्तरात स्पॉयलर नाहीत पण थोडा कथाभाग सांगितला आहे. त्यामुळे ज्यांना सिनेमा अगदी "सरप्राईज, सरप्राईज" पद्धतीने पाहायचा असेल त्यांनी सिनेमा उत्तर वाचण्याआधी बघा. चित्रपटाची कथा सुरू होते यतीन आणि कांचन या दाम्पत्याच्या घरी. दोघेही हार्वर्ड मधून उच्चविद्याविभूषित. दोघांचेही घराणे असेच विद्वत्तेच्या बाबतीत तोलामोलाचे असे त्यांच्या संवादातून आणि काही सूचक प्रसंगातून समजते. हे या दोघांचे असे असामान्य असणे हा चित्रपटाचा एक धागा आहे. अमेरिकेत मोठ्या घरात सुखवस्तू जीवन जगताना त्यांना अनिल आणि मेधा या जोडप्याची मित्र म्हणून साथ आहे. या "दृष्ट लागण्या जोगे सारे" संसाराला दुःखाची किनार येतेच. कांचनच्या दुसऱ्या गर्भपातानंतर डॉक्टरांना समजते की काही जनुकीय आजारामुळे तिला आई होता येणे कठीण आहे. या घटनेमुळे कांचन पुरती हबकली आहे. आजपर्यंत प्रयत्नांती काहीही मिळवू शकेन या तिच्या दुर्दम्य महत्त्वाकांक्षेला या एका गोष्टीने पार प...

Boring Game Of Thrones: The Last Watch

इमेज
It's been a few weeks since they aired the last episode of Game of Thrones. Most people including me couldn't get over the fact that this series has ended. We loved it so much that some of us are not ready to let it go. They are signing online petitions, they are booing the producers, some are speculating the prequel and some are writing their own version of how the show must have ended. I am heartbroken over the conclusion of Game of Thrones. Not that I didn't like the last season or felt betrayed by the abrupt ending of the Night King's storyline or the way Daenerys lost her mind. I always had quite a practical approach for this series - "it's just a fictional story, it won't matter if they kill your hero or how they end it". And I was honest about this feeling. I can say so because even though I haven't met anyone so far who is completely okay with season 8,  I, on the other hand, have a feeling of satisfaction and relief. I don't w...

लिहिणाऱ्याने लिहीत जावे..

इमेज
माझ्या ब्लॉगवर स्वागत आहे - या ब्लॉगवर मी मराठी आणि इंग्रजीमध्ये लेखन करतो. मी का लिहितो आपल्याला डायरी लिहिण्याचा सल्ला दिला जातो. ही चांगली सवय आहे. कारण जेव्हा आपण आपल्या चांगल्या वाईट अनुभवांबद्दल लिहितो तेव्हा आपण मोकळे होत असतो. उदाहरण द्यायचे झाले तर कधी हे अनुभवले आहे का - एखाद्याने तुमची घोर निराशा केली, अपमान केला, कशात तरी तुम्हाला अपयश आले. अशावेळेस या घटनेचा भुंगा आपल्या डोक्यात राहतो. वारंवार आपण घटनांची उजळणी करत राहतो कारण आपण स्वतः कसे एक चांगले व्यक्ती आहोत आणि बाकीचे लबाड आपल्या चांगल्या वर्तनाचा फायदा घेऊन गेले याचा खटलाच आपण चालवत असतो डोक्यामध्ये. अशा या विचारांची आवर्तने चालू झाली की नकारात्मकता तयार होऊन त्याचा शरीर मनावर परिणाम चालू होतो. याला उपाय म्हणजे लिहा. कडू, गोड, तक्रार, सरकारविषयी राग, समाजाविषयी राग व्यक्त करा. डोक्याला एकदा खात्री झाली की एका निष्णात वकीलाप्रमाणे जी केस तुम्ही रोज लढवत आहात त्याचे सगळे मुद्दे तुम्ही लिहिले आहेत आणि आता ते परत विसरण्याचा धोका नाही, तेव्हा तो शांत होईल. तुमचे डोके नवीन दृष्टीकोन समजून घेण्याकरता ग्रहणक्षम होईल...

Roommates

इमेज
My first international roommate was a  South Korean  guy when I was in Wroclaw Poland for the studies. The second semester I had two roommates - One was an  Ethiopian , the other was a Pakistani. The funny thing was that Ethiopian Christian, the  Pakistani  Muslim and I a Hindu made an interesting combination. The third semester I stayed with two  Polish  guys. Apart from this, when I was traveling, I have stayed with an  Italian , An  American , An  Australian , A  British , A  Japanese  as a roommate for a day or two. Long Answer - South Korean Yeobi was a math nerd. He was staying there already when I arrived and he subtly told me that he preferred the room clean and tidy all the time. Later when I showed him my way of keeping the room clean and tidy, he said that I needed to tone it down a bit for him to which we had a good laugh. I asked him so many questions on South and North Korea relations. In one of...