Tere Bin Laden
अप्रतिम लादेन!
माझ्या बहिणीच्या वाढदिवसाचे.. म्हणजे ९/११ चे अफगाणिस्तान आणि इराकवरच नव्हे तर तुमच्या माझ्यावरही परिणाम झाले. गोऱ्यांच्या उडालेल्या घाबरगुंडीमुळे काही जणांना विसा मिळवण्यात अडचण आली तर काहींना मिळालाच नाही.. (बेंडाळे, टाके उसवतील दमाने घ्या..). म्हणूनच विसा मिळवण्यासाठी हिरोने केलेल्या या सर्व खटाटोपांचे कौतुक वाटते. लादेन सारख्या दिसणाऱ्या नूरा कोंबडीवाल्याचे हाल पाहून हसता हसता पुरेवाट होते. कमी बजेट मधेही "technically correct" राहिले तर बाकी काम डिस्कवरी च्या फ्रेम्स वापरून पण होते हे लैच भारी.. बाकी अटकेपार झेंडे लावल्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तान मध्ये मराठी accent गेली असेल.. hehe..
हा सिनेमा बघून "Burn After Reading" ची आठवण झाली, फुल्ल वेड्यांचा बाजार.. मजा आली पण..
पिक्चर संपल्यावर या विसा प्रकरणावरून मलापण उगाच आपला डायलॉग मारावा वाटला.. "माय नेम इज 'आशिष शेटे', अॅन्ड आय अॅम नॉट अ टेररिस्ट"..
कुणाल, सुहास.. बेंडाळे तिकडे लोळत असतील तर त्यांना उठवा.. :D :D
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!