बूम बूम रोबो दा.. रोबो दा.. Robot
१. एक रोबॉट मानवाला इजा करत नाही , अथवा निष्क्रीय राहून मानवाला इजा होऊ देत नाही.
२. एक रोबॉट मानवाच्या सगळ्या आज्ञांचे पालन करतो, जोवर या आज्ञांमुळे पहिल्या नियमाचे उल्लंघन होत नाही.
३. एक रोबॉट स्वतःच्या अस्तित्वाचे रक्षण करतो, जोवर ते करताना पहिल्या किंवा दुसऱ्या नियमाचे उल्लंघन होत नाही.
डॉ. वसीकरण म्हणजे आपला सुपरस्टार रजनीकांत, चा रोबॉट (इंधिरण), चिट्टी.. या नियमांना अनुसरून बनवण्यात आलेला नाही. कारण त्याला भारतीय लष्करासाठी, शत्रूला संपवण्यासाठी बनवण्यात आलेला आहे.
आयझक असिमोव्ह ने उधृत केलेल्या रोबोटिक्स च्या वरील नियमांना बगल दिली तर तर काय होऊ शकते, हा विषय नवीन नाहीये. विल स्मिथच्या I Robot मध्ये आपण ते पाहिलेही आहे. I Robot मध्ये, भावना असलेला रोबॉट (Sonny) पण होता आणि तद्दन तर्कसंगत विचार करून या नियमांना झुगारून देणारी WIKI पण होती.. होता.. जे असेल ते..
पण मानवाला मुळात एका यंत्रात भावना देण्याची गरजच का पडावी..? हा प्रश्न माझ्या माहितीत तरी हॉलीवूड ने हि हाताळला नाही. शंकर चा हा सिनेमा, माझ्यासाठी इथेच वेगळी पातळी गाठतो.
एका प्रसंगामधून अगदी नेमकेपणाने या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. (चिट्टी पेटलेल्या इमारतीतून लोकांना बाहेर काढतानाचा प्रसंग). भावना नसतील तर असिमोव्ह चे हे अगदी अभेद्य नियम पण तोकडे पडू शकतात. आणि हा तिढा सोडवण्यासाठी राग, मोह, मत्सर, प्रेम, दया, दु:ख, लज्जा, सम वेदना, सूड, स्वार्थ, त्याग, आशा, आकांक्षा, अपेक्षा, निराशा या मानवी भावना असलेले, समजणारे यंत्र तयार केले तर काय राडा होईल हे रजनीकांत इश्टाईल पद्धतीने बघायचे असेल तर "रोबॉट" बघणे अपरिहार्य..
रोबॉट आणि तो पण रजनीकांतने बनवलेला म्हंटल्यावर तो रजनिगिरी करणारच..
तमिळ सिनेमांतले हिरो अतिमानवीय (superhuman) कर्तब करतात, उ.दा. पाय फिरवून वादळ तयार करणे.
आणि रजनीकांत जर असेल तर ते शक्यही वाटतात.. :), इथे तर रजनीचा रोबो.. मग काय तो पण अति'यन्त्र'मानवीय कामगिरी करतो.. उ.दा. गुरुत्वाकर्षणाची एैशी तैशी करणे, केंद्रित (focussed) चुंबकीय क्षेत्र बनवणे, डासांशी बोलणे (प्लीज.. आवरा आरे.... हि निखिलची प्रतिक्रिया..)
मेरी दस साल कि मेहनत..
डॉ. वसिचे त्याच्या स्वतःच्याच यंत्रावर डाफरणे अगदीच अंगावर येते, म्हंजे कधीकधी मी पण एखाद्या पॉइंट वर चिडतो, म्हणतो "तुला सरफेस च्या कुठल्या बाजूला आहेस हे ओळखायला शिकवले ना, मग तू सरफेस वर आहे हे तुला स्वतःचे स्वतः नाही कळत, मुर्ख कुठला", असो.. पण मी न्यूरल नेटवर्क कुठे वापरतो.. :)
गद्दारी नाही..
शंकरने हा सिनेमा तब्बल २०० कोटी रुपये खर्च करून बनवलाय, हॉलीवूड च्या तंत्रज्ञांची फौजच दिसते नामावलीत. संवादांवरून रोबोटिक्स चे जाणकार मंडळींचा सल्ला घेतलाय याची जागोजागी खात्री पटते. पण ज्या तमिळ प्रेक्षकांसाठी हा सिनेमा बनवलाय त्यांच्याशी बेईमानी नाही. पिक्चर च्या क्लायमॅक्स मध्ये रोबोंचे चित्रविचित्र रचना आणि आकार तयार करणे हे खास त्यांच्यासाठीच.
ऐश्वर्या..
मला वाटते, ऐश्वर्याला इतक्या पेहारावांमध्ये आणि इतक्या रंगसंगतीत बघणे हाच एक अनुभव आहे. जिसके हुस्न कि तारीफ करते करते हजारो शायरांची लेखणी झिजली.. त्यात आपला नंबर नको..
स्वानंद किरकिरे नि मात्र "किलीमंजारो लडकी पर्वत कि यारो" म्हणत त्यात 'मोलाची' भर घातलीये.
हे गाणे अप्रतिम झाले आहे.. कोणी काही म्हणा मग.. पाठीमागे पेरूमधल्या माचू पिक्चू चे अवषेश, लामा, इंका लोकांसारखा पेहराव केलेले नर्तक, रजनी, आणि अशक्य दिसणारी ऐश्वर्या.. विकीलाही या गाण्याची दखल घ्यावी वाटली.
होंडांचा असिमो, सध्याचा सर्वात प्रगत मानवसदृश (Humanoid) रोबॉट.
सुमार पार्श्वसंगीत.
बॅकग्राउंड स्कोर अगदीच साधारण आहे, आणि कधीकधी कर्कश्श वाटतो.
टर्मिनेटर आणि स्कायनेट.
या सिनेमातल्या संकल्पना पचत नसतील तर जरूर वाचा.
तर हा पिक्चर मला आवडलाय, आणि दाक्षिणात्य सिनेमाबद्दलचे पूर्वग्रह बाजूला ठेवून तुम्हीपण बघा..
A must-watch!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अभिप्रायासाठी अनेक आभार!