बेल्जियम ची आठवण





January 2016

बेल्जियम ला जायचेच असे काही ठरवले नव्हते. SAP परीक्षेची डेट तिसर्यांदा पुढे ढकलली तेव्हा ३ ऑप्शन होते. पोलंड, फ्रांस आणि बेल्जियम. ऑस्ट्रिया मध्ये परीक्षेचे केंद्र असूनही तिथे वेळ घेता येत नव्हती कारण जो कोर्स मी डूइसबुर्ग विद्यापीठातून केला होता त्यांचे काही नियम होते. पोलंड ला जायला बरीच कटकट होती. रायनएयर चे पर्याय शोधताना लक्षात आले की स्लोवाकिया मधल्या ब्रातीस्लावा (Bratislava) शहरातून ब्रसेल्स ला जायला स्वस्त फ्लाईट आहेत. ब्रसेल्स ला दोन विमानतळ आहेत. एक मुख्य ब्रसेल्स आणि दुसरा शार्लरोय (Charleroi). ४१ युरो मध्ये रिटर्न फ्लाईट मिळाल्यामुळे लागलीच बुक केले. नंतर ८ जानेवारी ची परीक्षेची डेट घेतली. हे साधारण १०-११ डिसेंबर च्या दरम्यान केले. रिटर्न डेट १० जानेवारी होती. ब्रसेल्स पण पाहून होईल हा उद्देश.

नंतर डीटेल मध्ये प्ल्यान करताना लक्षात आले की शार्लरोय ब्रसेल्स पासून ६० किलोमीटर आहे आणि तिथून ब्रसेल्स ला जाण्यासाठी शटल्स असतात. त्याचे भाडे १४ युरो. एक आठवडा आधी केले असते तर ५ युरो पडले असते.
ऑस्ट्रिया मध्ये OEBB ट्रेन सर्विस आहे. त्यांचे विएन्ना ला जायचे भाडे एरवी ३० युरो असते. माझ्याकडे Vorteilscard आहे. हे कार्ड म्हणजे पास च असतो. वर्षाला ९९ (२६ वर्षांखाली १९ युरो) युरो दिले की मिळते. त्याने ऑस्ट्रिया मधल्या रेल्वे भाड्यात ५०% सूट मिळते आणि ऑस्ट्रिया बाहेर जाणार्या तिकिटांवर २५%.

अजून त्यात OEBB ची स्पारशीन (Sparschiene)नावाची सवलत आहे. यात ३ कमीत कमी दिवस आधी बुक केले, तर भरगच्च सवलत मिळते. म्हणजे जे विएन्ना चे तिकीट मला १५ युरो ला मिळायचे ते मला ९ युरो मध्ये मिळाले.

विएन्ना ते ब्रातीस्लावा स्लोवाक लाईन्स ची बस आहे. उत्कृष्ठ सेवा. ही बस विएन्ना बान्होफ पासून विएन्ना एयरपोर्ट ते ब्रातीस्लावा शहर ते ब्रातीस्लावा एयरपोर्ट जाते. भाडे फक्त ५ युरो. रिटर्न तिकीट बुक केले तर ८ युरो.

७ जानेवारीला माझी ८.३० ची फ्लाईट होती ब्रातीस्लावा वरून. काप्फेनबर्ग वरून सकाळी ११ वाजता ची ट्रेन पकडली. ट्रेन तशी सावकाशच होती. २.३० वाजता विन स्टेशन वर पोचलो. तिथून मिनिटभराच्या अंतरावर बस स्टेशन आहे. ३ वाजता ची स्लोवाकलाईन्स ची बस पकडून ब्रातीस्लावा एयरपोर्टला ४.४५ वाजता पोचलो. तापमान शून्याच्या खालीच होते. सगळीकडे धुके. पुढचे २ तास तिथे एयरपोर्ट वर कोरा वर काढले. छोटे पण सुंदर एयरपोर्ट. इंटरनेट फ्री.

चेकीन २ तास आधीच चालू झाले. खूप मोठी लाईन होती. बरे झाले लवकर रांगेत थांबलो कारण लाईन खूपच हळूहळू पुढे जात होती. रायनएयर म्हणजे आपल्या इकडच्या इंडिगो किंवा गो एयर सारखीच स्वस्त पण उत्तम सेवा.

फ्लाईटदरम्यान शेजारी खूपच इंटरेस्टिंग मुलगी भेटली. आतापर्यंतच्या सर्व विमानप्रवासामधली अविस्मरणीय. तिच्याशी छान गप्पा मारता आल्या. टिपिकल हिप्पी. जटा असलेले केस, पर्यावरणाची कळवळ, भारताबद्दल उत्सुकता. पुढच्या दीड तासात शार्लरोय आलेपण. या भेटीबद्दल इथे लिहिले आहे.


चेकइन ब्याग नसल्यामुळे विमानतळावरून लगेच बाहेर येता आले. तिथून ब्रसेल्स साठीची शटल बस तयार उभीच होती. तिकीट मी आधीच बुक केले होते. रात्रीचे ११ वाजता बस निघाली आणि साधारण ११.४५ ला ब्रसेल्स च्या मिडी स्टेशन वर पोचली. मी बुक केलेले Urban City Centre होस्टेल तिथून पायी अंतरावरच होते. पण नकाशा नव्हता आणि रात्री दिशा पण कळेना. तेव्हा स्टेशन वरच्या एका स्टाफ मेम्बर ला विचारले. त्याने दिशा दाखवली. मग पुढच्या चौकात एका टर्किश शॉप मध्ये परत विचारले. असे करत Urban City Centre होस्टेल सापडले. चेक इन केले. बरोबर आणलेला केक आणि चिप्स खाल्ले. इंटरनेट वर टाईमपास केला आणि थोड्या वेळाने ८ बेड असलेल्या माझ्या रूम मध्ये झोपायला गेलो. इतर बहुतेक होस्टेल मध्ये असते तशी स्वच्छ बेड आणि बाथरूम. हवेत तशी थोडी थंडी होती पण अगदीच नाही. सकाळी १० वाजता ची फ्री वोकिंग टूर होती. ८ चा गजर लावून झोपून गेलो.

दुसर्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे आटपून, एक कॉफी आणि सोबतची बिस्किटे खाऊन मीटिंग पॉइंट कडे निघालो. आता इंटरनेट वर आधीच दिशा बघून ठेवल्या होत्या आणि गुगल म्याप वरचे स्क्रीनशॉट घेतले होते. संडेमान ची टूर ग्रांड प्लास वरून चालू होणार होती.




तळटीप :
२९ डिसेम्बर २०१८
हा लेख असाच ड्रॅफ्टस मध्ये सेव करून ठेवला होता. हे असे असते.. ज्या त्या वेळी पूर्ण लिहायला हवे. आता मला बरेसचे डीटेल्स आठवत नाहीत. इंटरेस्टिंग टूर झाली होती. ब्रुज (Bruges) , घेन्ट (Ghent) ला पण गेलो होतो. युरोपियन युनियन ची संसद बघितली होती.


टिप्पण्या

Popular Articles on This Site

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

सर्वात आनंदी देश : फिनलंड.. पण खरचका?

आजी आणि नागरमुन्नोळीचे पांडुरंग कुंभार क्लीनिक