पोस्ट्स

एका तेलियाने

इमेज
मी मागच्याच आठवड्यात "एका तेलियाने" हे गिरीश कुबेरांचे पुस्तक वाचले. सौदी अरेबिया, व्हेनेझुएला, लिबिया, कुवेत, इराण इत्यादी तेलउत्पादक देशांचा २० व्या शतकातला संक्षिप्त इतिहास वाचायला आवडणार असेल तर तुमच्यासाठी हे चांगले पुस्तक आहे. पश्चिम आशियातल्या मागास टोळीवाल्या देशांमध्ये विसाव्या शतकातच्या सुरुवातीला खनिज तेल मिळाल्यानंतर तिथले झालेले बदल; अमेरिका, ब्रिटन, फ्रांस, सोविएट रशिया या तात्कालीन बड्या राष्ट्रांमध्ये या नवीन संपत्तीवर वर्चस्व मिळवण्यासाठी चालू असलेली रस्सीखेच; इस्राएल, पॅलेस्टिन, इजिप्त, लिबिया, सीरिया यांचा या खेळामध्ये केला गेलेला वापर, युद्ध, तह, हेरगिरी; ते तेल विकून मिळालेल्या अमर्याद संपत्तीचा उपभोग घेणारे शेख यांच्या अजब कहाण्या या पुस्तकात आहेत. पुस्तकाचा आवाका मोठा असला तरी त्यात क्लिष्टता नाही वाटली. आणि या पुस्तकाची सर्वात आवडलेली बाब म्हणजे या सर्व घटनांना एक हिरो देखील आहे. सौदी अरेबियाचा तेलमंत्री म्हणून कारकीर्द गाजवलेले झाकी यामानी हे या पुस्तकाचे नायक. अरब तेलावर पोसलेल्या पाश्चात्य विकसित देशांच्या तेल कंपन्यांना त्यांच्याच पद्धतीने वठणीव...

साधू संत येति घरा..

इमेज
पूर्वी जसे समर्थ महाराज, साईबाबा आणि असे बरेच संत महात्मे होऊन गेले, तसे लोक आता का दिसत नाहीत? इतके सामर्थ्यवान सध्या कोणी आहेत का? चांगला विचार करायला लावणारा प्रश्न आहे. मला याची पुढील कारणे दिसतात : १. साधुसंत ज्या काळात झाले त्या काळात त्यांच्या हयातीत आसपासच्या लोकांना सोडून किती जणांना हा माणूस सिध्दपुरुष आहे, संत आहे किंवा साधू आहे हे समजले असेल? या सिद्धपुरुषांनी आपले अवतारकार्य संपवल्यावरच त्यांच्या बऱ्याचशा महिमा त्यांच्या अनुयायांकडून इतर समाजाला समजल्या असतील, वास्तविकतेला कल्पनेची, गद्याला पद्याची जोड मिळून त्यांची कीर्ती सर्वदूर पोहोचली असेल. कस्तुरी मृगाला जसे स्वतःच सुगंधाचा स्रोत आहोत हे समजत नाही, तसेच वर्तमानात देखील आजूबाजूला असे सिध्दपुरुष असतीलही पण आपल्याला ते कळणार नाही किंवा उशिरा समजेल. इतिहासात बरेचदा हेच पाहायला मिळते कि महापुरुषांना खांद्यावर घेऊन नाचणाऱ्यांपेक्षा त्यांच्या मार्गात धोंडे घालणारेच जास्त असतात. किंबहुना अशा धोंडे घालणाऱ्या परिस्थितींवर ते मात करतात म्हणूनच भविष्यकाळात त्यांना महापुरुष म्हणून ओळखले जाते. वर्तमानात असे 'In Progress' मह...

कर्म आणि दैव

इमेज
मला पूजा करत बसणे, देव देव करत बसणे जास्त आवडत नाही "कर्म चांगले तर सर्व चांगले" असं माझं मत आहे. खरा देव काय हे या पूजा करणाऱ्यांना कळत नाही पण हे सांगायला गेलं की लोक मला वेड्यात काढतात. मी काय केले पाहिजे सर्व नमुने लोक भरलेत माझ्या अवती भोवती? 🙄 https://qr.ae/prGZjm एका व्याख्यानात[1] खालील कथा ऐकली होती. या विषयाला अनुसरून आहे म्हणून सांगतो. एकदा एक प्रख्यात डॉक्टर एका वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये जातात. हॉस्पिटल मधले सर्वात 'शहाणे' वेडे म्हणून तीन वेड्यांना त्यांच्यासमोर उभे केले जाते. या तिघांना डॉक्टर साहेब सांगतात "माझ्या प्रश्नाचे तुमच्यापैकी जो कोणी बरोबर उत्तर देईल त्याला हा आता बरा झाला आहे या सर्टिफिकेट सहित या हॉस्पिटल मधून आम्ही घरी सोडू". तिघेही वेडे कान टवकारतात. डॉक्टर प्रश्न विचारतात - ३ गुणिले ३ किती? पहिला वेडा - सोप्पंये ३ गुणिले ३ डाळिंब. या तिघांना 'शहाणे' म्हणून डॉक्टरांसमोर आणणाऱ्या जुनियर डॉक्टर कडे मोठे डॉक्टर रागाने बघतात. दुसरा वेडा - ३ गुणिले ३ बरोबर मंगळवार. आता मात्र तिथले जुनियर डॉक्टर आणि वॉर्डबॉय दोघांच्या कपाळावर ...

झी झर चे खुळ

इमेज
आजकाल महिला आणि पुरुष सोशलमीडियावर आपल्या नावा समोर '(he/him/his)' किंवा '(she/her)' लावतात, हे काय प्रकरण आहे? छोटे उत्तर - मागच्या काही वर्षात हे "प्रेफर्ड प्रोनाउन्स" (Preferred Pronouns) ची टूम पाश्चात्य राष्ट्रांमध्ये काही गटांमधून निघाली. तर या गटांचे म्हणणे असे आहे की एखादा पुरुषाला तो स्त्री आहे असे वाटू शकते. तसेच एखाद्या स्त्रीला तो पुरुष आहे असे वाटू शकते. एखाद्याने लिंगबदल करून घेतले असेल, आणि एखाद्याला पुरुष किंवा स्त्री दोन्हीही संबोधने नकोशी वाटतील. तर अशा लोकांना समाजाने समजून घ्यावे आणि त्यांनी स्वतः सांगिलेल्या संबोधनाने ओळखावे. त्यातून She, Her, He, Him या सामान्यपणे वापरलेल्या संबोधनाबरोबर काही लोक they, them, it वापरातायेत आणि काहींनी चक्क zer, ze अशी मनमानी संबोधने शोधली. आणि सध्या परिस्थिती अशी आहे कि अशी स्वघोषित ७० संबोधने आहेत. ज्यांची भावना "आईंग?" अशी झाली असेल त्यांच्यासाठी मोठे उत्तर - मी हे प्रकरण गेल्या ४-५ वर्षांपासून फॉलो करत आहे त्यामुळे याची बऱ्यापैकी कल्पना आहे. आपल्या इथे हे आत्ता आत्ता पोचले आहे. पण पाश्चात्य वि...

ऑनलाईन शॉपिंग

इमेज
माझ्या दैनंदिन वापरातील या वस्तू मला अतिशय उपयुक्त वाटल्या. १. मच्छरांना हाकलण्यासाठी केमिकल वेपरायझजर इतकी वर्ष वापरत आलो. मला नेहमी वाटायचे की ही रसायने जी मच्छरांना नको असतात ती आपल्या शरीराला काही प्रमाणात का होईना हानिकारक असतील. पण त्याला पर्याय देखील नव्हता. मच्छरदाणी एकतर फार किचकट प्रकार. वर लावली की फॅन ची हवा देखील लागत नाही. मच्छरांना मारण्यासाठी रॅकेट देखील आहेच, पण ते घेऊन मच्छरांच्या मागे टेनिस खेळावे लागते. त्यामुळे नाईलाजाने का होईना, गुडनाईट, ऑल आऊट सारखे वेपरायझर्स महिन्यातून दोन वेळा आणून लावणे हाच पर्याय होता. घरात बाळ आल्यापासून गुडनाईट वेपरायझर वापरणे आणखी धोकादायक वाटू लागले होते. असे काही असेल का जेणेकरून या व्हेपरायझर पासून सुटका होईल, हे शोधताना मला खालील लॅम्प सापडला. याचे कार्य इलेक्ट्रिक रॅकेट सारखेच आहे पण निळ्या प्रकाशाकडे मच्छर स्वतःहून आकर्षित होऊन मरतात. मला तर घेण्यापूर्वी विश्वासच नव्हता. पण एक दोन दिवसातच याची उपयुक्तता कळली. आज दोन महिने झाले आम्ही घरात गुडनाईट किंवा ऑलआऊट आणले नाही. हा लॅम्प एका ठिकाणी लावून झोपले कि मच्छरांचा काहीही त्रास होत...