पोस्ट्स

बूम बूम रोबो दा.. रोबो दा.. Robot

इमेज
१. एक रोबॉट मानवाला इजा करत नाही , अथवा निष्क्रीय राहून मानवाला इजा होऊ देत नाही. २. एक रोबॉट मानवाच्या सगळ्या आज्ञांचे पालन करतो, जोवर या आज्ञांमुळे पहिल्या नियमाचे उल्लंघन होत नाही. ३. एक रोबॉट स्वतःच्या अस्तित्वाचे रक्षण करतो, जोवर ते करताना पहिल्या किंवा दुसऱ्या नियमाचे उल्लंघन होत नाही. डॉ. वसीकरण म्हणजे आपला सुपरस्टार रजनीकांत, चा रोबॉट (इंधिरण), चिट्टी.. या नियमांना अनुसरून बनवण्यात आलेला नाही. कारण त्याला भारतीय लष्करासाठी, शत्रूला संपवण्यासाठी बनवण्यात आलेला आहे. आयझक असिमोव्ह ने उधृत केलेल्या रोबोटिक्स च्या वरील नियमांना बगल दिली तर तर काय होऊ शकते, हा विषय नवीन नाहीये. विल स्मिथच्या I Robot मध्ये आपण ते पाहिलेही आहे. I Robot मध्ये, भावना असलेला रोबॉट (Sonny) पण होता आणि तद्दन तर्कसंगत विचार करून या नियमांना झुगारून देणारी WIKI पण होती.. होता.. जे असेल ते.. पण मानवाला मुळात एका यंत्रात भावना देण्याची गरजच का पडावी..? हा प्रश्न माझ्या माहितीत तरी हॉलीवूड ने हि हाताळला नाही. शंकर चा हा सिनेमा, माझ्यासाठी इथेच वेगळी पातळी गाठतो. एका प्रसंगामधून अगदी नेमकेपणाने या प्रश्नाच...

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..

इमेज
लहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे "महाभारत" आणि रामानंद सागर यांचे "श्रीकृष्ण" याच्यात कोण भारी याच्यावर चर्चा, आणि माझ्यासारख्या पिटुकल्यांना स्पेशल इफेक्ट युक्त छान छान गोष्टी. हे श्रीकृष्ण तसे चांगलेच होते, पण मध्ये मध्ये रामानंद सागर येवून नुसतेच बोलायचे, कधी कधी अर्धा तास बोलायचे, लय बोर व्हायचे मग. याची आठवण का यावी मधेच.. तर झाले असे कि मागे काही दिवसांपूर्वी कुठल्यातरी वाहिनीवर परत हि धून ऐकली आणि म्हटले पाहू तरी आता कसे वाटते श्रीकृष्ण बघून. अवतार आणि मेट्रिक्स सारखे सिनेमे बघायची सवय झालेल्या डोळ्यांना त्या लो बजेट स्पेशल इफेक्ट ची मजा काय कळणार आता? तरीही कुठल्या तरी गोष्टीनी खिळवून ठेवले. अर्धा तास अगदी ब्रेक सकट तो भाग पाहिला. तो भाग होता कालयवन वधाचा. अगदी वरवर गोष्टच सांगायची म्हटली तर.. जरासंध कृष्णाच्या हात धुवून मागे लागलेला. तशात तो कालयवन नावाच्या दुष्ट राजाची मदत घेतो. हा कालयवन महापराक्रमी, साक्षात कृष्णाला पण सळो कि पळो करून सोडतो. कृष्ण पण हुशार माणूस, तो त्याला ...

एका पॅच ची गोष्ट..

इमेज
P E C F D आता हे वाचा E D F C Z P, प्रत्येक क्लिक गणिक छोट्या होणाऱ्या त्या अक्षरांच्या रांगांना कसून प्रयत्न करत वाचतोय. तिथल्या बहुधा इंटर्न असलेल्या डॉक्टरने फोन उचलला. माझ्याएवढाच, किंवा माझ्यापेक्षाही लहान असलेला इंटर्न. "Ma'am, new patient, shuttlecock injury. I checked his eye pressure, it's normal. Sight 6/6. I suspect internal hemorrhage", फोन ठेवून परत माझ्याजवळ येतो, "हम्म, ठेवा हनुवटी इथे, फोरहेड टेकवा समोर. सरळ बघा." त्या प्रकाश पुंजक्याकडे बघतोय. सकाळी कोर्ट वर टंच पोरगी बघून सुखावणारा माझा डोळा, आता अस्तित्वाची परीक्षा देतोय.. च्यामारी, ऐतिहासिक नाटकाचा अंक लिहिल्यासारखं वाटतय. जाउदे, कसेही लिहिले तरी पब्लिक वस्तारे घेउनच बसलीये. थोड्या वेळाने मोठ्या डॉक्टर आल्या. एक्सामीनेशन चेयर वर बसून, डोळे किलकिले करत वर पाहिले. करारी व्यक्तीमत्व.. आल्याआल्या कोणीतरी जाहीर केले, डॉक्टरांनी "shuttlecock injuries" या विषयावर रिसर्च पेपर पब्लिश केला होता. त्या दुखऱ्या अर्धवट बंद डोळ्यालाही विस्फारायाचा मोह झाला. चायला, लोकं असल्या दुर्मिळ विषयाव...

Inception Stills

इमेज

Tere Bin Laden

इमेज
अप्रतिम लादेन! माझ्या बहिणीच्या वाढदिवसाचे.. म्हणजे ९/११ चे अफगाणिस्तान आणि इराकवरच नव्हे तर तुमच्या माझ्यावरही परिणाम झाले. गोऱ्यांच्या उडालेल्या घाबरगुंडीमुळे काही जणांना विसा मिळवण्यात अडचण आली तर काहींना मिळालाच नाही.. (बेंडाळे, टाके उसवतील दमाने घ्या..). म्हणूनच विसा मिळवण्यासाठी हिरोने केलेल्या या सर्व खटाटोपांचे कौतुक वाटते. लादेन सारख्या दिसणाऱ्या नूरा कोंबडीवाल्याचे हाल पाहून हसता हसता पुरेवाट होते. कमी बजेट मधेही "technically correct" राहिले तर बाकी काम डिस्कवरी च्या फ्रेम्स वापरून पण होते हे लैच भारी.. बाकी अटकेपार झेंडे लावल्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तान मध्ये मराठी accent गेली असेल.. hehe.. हा सिनेमा बघून "Burn After Reading" ची आठवण झाली, फुल्ल वेड्यांचा बाजार.. मजा आली पण.. पिक्चर संपल्यावर या विसा प्रकरणावरून मलापण उगाच आपला डायलॉग मारावा वाटला.. "माय नेम इज 'आशिष शेटे', अॅन्ड आय अॅम नॉट अ टेररिस्ट".. कुणाल, सुहास.. बेंडाळे तिकडे लोळत असतील तर त्यांना उठवा.. :D :D